Top News

ओबीसी जनगणनेसाठी राजकारण बाजूला ठेवून एक दिलाने एकत्र या - संजय मते (ओबीसी क्रांती मोर्चा भंडारा चे मुख्य संयोजक अध्यक्ष)

ओबीसी जनगणनेसाठी राजकारण बाजूला ठेवून एक दिलाने एकत्र या -  संजय मते (ओबीसी क्रांती मोर्चा भंडारा चे मुख्य संयोजक अध्यक्ष)



(विदर्भ माझा न्युज 24)भंडारा :-   ओबीसी जनगणना न्याय हक्कासाठी ओबीसी बांधव मागील पारतंत्र काळापासून प्रशासन आणि सरकारशी लढा देत आहे. १९३१ मध्ये ओबीसींची जनगणना झाली होती. त्यानंतर देश स्वतंत्र झाले. मात्र, ओबीसी जनगणनेची समस्या जैसे थे आहे. मात्र, आता कुठले ना, कुठले कारण समोर करून ओबीसींचा मुद्दा बाजूला ठेवला जातो. भंडारा जिल्ह्याचे राजकारण हे देशाच्या केंद्र बिंदूस्थानी आहे. भंडारा जिल्ह्यात राजकारणात उच्च पदापर्यंत पोहोचलेले व्यक्तिमत्व आहेत. मात्र, मागील काही दिवसांपासून या ओबीसी लढ्याच्या मुद्द्यावरून एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रकार सुरू झाला आहे. भंडारा जिल्ह्याचे सुपुत्र नानाभाऊ पटोले तसेच नागपूरचे सुपुत्र व सध्या भंडारा जिल्ह्याची कर्मभूमी असलेले डॉ परिणयजी फुके या दोघांनीही ओबीसी न्याय हक्कासाठी आपापल्या परीने भूमिका मांडली आहे.

          नानाभाऊ पटोले हे ओबीसी तथा बहुजनांचे एक लढवय्ये नेते म्हणून सर्वश्रुत आहेत. तर, कुठल्याही परिस्थितीत हार न मानणारे असे व्यक्तिमत्त्व म्हणून डॉ परिणयजी फुके यांची ओळख आहे. एकेकाळी नानाभाऊंना राजकीय गुरु अशी उपाधी देणारे परिणयजी फुके आता नानाभाऊ पटोले यांच्या विचारांवर फारकत घेऊन त्यांच्यावरच ओबीसींच्या मुद्द्यावर कुरघोडी करीत तर नाही ना? असा संशय ओबीसी बांधवांमध्ये निर्माण होऊ घातला आहे. नानाभाऊ पटोले यांनी ओबीसींचा मुद्दा लावून धरला नाही, अशी टीका फुकेजी यांनी काही दिवसापूर्वी पटोलेजी यांच्यावर केली होती. तर केंद्र सरकारच्या लेटलतीफ कारभाराचा ओबीसी बांधवांना फटका बसत असल्याची टीका पटोलेजी यांनी करुन परिणयजी फुके यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. 

          नानाभाऊ पटोले आणि परिणयजी फुके यांच्या राजकारणात सध्या उत्तर-दक्षिण अशी स्थिती असली तरी, या दोन्ही ओबीसी नेत्यांनी ओबीसींच्या हक्कासाठी एकत्र येणे काळाची गरज ठरली आहे. एकमेकांवर कुरघोडी करण्यापेक्षा दोन्ही नेत्यांनी राजकारणाच्या पलिकडील संबंध जोपासून ओबीसीच्या समस्या जाणून त्या तातडीने निकाली काढण्यासाठी हातात हात घालून एकत्र येणे गरजेचे आहे. नानाभाऊ पटोले यांनी काँग्रेसच्या माध्यमातून. तर, परिणयजी फुके यांनी भाजपच्या माध्यमातून ओबीसीचा मुद्दा पोटतिडकीने मांडल्यास तो यात दोघेही यशस्वी होईल. आणि येणाऱ्या जून २०२१ च्या जनगणनेमध्ये नक्कीच यश मिळेल, यात तीळमात्रही शंका नाही. मात्र, त्यासाठी या ओबीसी नेत्यांनी ओबीसी विचार मंचावर एकत्र येणे काळाची गरज आहे. यासोबतच देशपातळीवर नेतृत्व करणारे राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुलजी पटेल आणि भंडारा जिल्ह्याचे खासदार सुनीलजी मेंढे या खासदारांनीही ओबीसी जनगणनेसाठी आणि न्याय हक्कासाठी केंद्र सरकारकडे प्रतिष्ठेचा मुद्दा करून सातत्याने पाठपुरावा करून तो मार्गी लावण्यास सहकार्य करावे. किंबहूना या ओबीसी प्रवर्गाच्या नेत्यांनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा करून त्यात ओबीसींना न्याय द्यावा, यात यासाठी सर्वांनी आता राजकारण बाजूला सारून एकत्र येणे गरजेचे आहे.असे आव्हान ओबीसी क्रांती मोर्चा भंडारा चे मुख्य संयोजक अध्यक्ष संजय मते  यांनी केले आहे.


 

Previous Post Next Post