गोंडराजेंचे स्मारक चांदा नगरीत उभारा...गोंडवाना स्मारक समीती तर्फे महापौरांना निवेदण.
(विदर्भ माझा न्युज 24)चांदा :- चांदा (चंद्रपुर) हा जिल्हा खांडक्या बल्लाळशाह राजे यांनी वसवीलेला आहे चांदा गड ची परकोट,ऐतीहासीक मंदीरे,ऐतीहासीक वास्तु आता पन काही प्रमानात व्यवस्थीत आहे, मात्र एवढ्या मोढ्या विशाल गोंड साम्राज्यात गोंडराजेंच एकही स्मारक नाही ही खेदाचीच बाब आहे, अस गोंडवाना स्मारक समीती ने निवेदनात म्हनटले आहे,
तर चांदा (चंद्रपुर) शहरात आपन रहातो त्या शहराला ९०० वर्षांचा इतीहास आहे मात्र आपन न्याय देऊ शकलो नाही, तर प्रशासनाने
जटपुरा गेट वर विश्व पराक्रमी महाराजा खांडक्या बल्लारशाह राजे आत्राम,पोलीस मुख्यालय समोर शहीद क्रांतीवीर बाबुराव पुलेसुर शेडमाके,अंचलेश्वर गेट समोर गोंडराणी राजमाता हीराई आत्राम यांचे स्मारक उभारावे असे या निवेदणात गोंडवाना स्मारक समीती ने म्हनले आहे.या वेळी मनोज आत्राम,धीरज सेडमाके,विलास परचाके,गनपत नैताम,पेंदाम सागर कुमरे हे उपस्थीत होते.


