Top News

करोना महामारीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांचा (घरघुती व कृषिपंप) वीजबिल प्रश्न निकाली काढण्या यावे. - सुनील रत्नाकर भोयर,(संघटनमंत्री आप)

करोना महामारीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांचा (घरघुती व कृषिपंप) वीजबिल प्रश्न निकाली काढण्या यावे. - सुनील रत्नाकर भोयर,(संघटनमंत्री आप,चांदा)



 (विदर्भ माझा न्युज 24) चांदा :- कोवीड-१९ महामारी दरम्यान लॉकडाऊन मुळे राज्यात मार्च ते जून 2020 पर्यंत नागरिकांचा रोजगार पूर्णपणे बंद करण्यात आला होता. त्यानंतरही मागील दोन महिन्यात महामारी वाढत असल्याने अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन होते आणि आपण पुन्हा लॉकडाऊन घोषित केले आहे.यामुळे जनता यामधून बाहेर पडलेली नाही. परंतु महावितरण कडून लॉक डाऊन काळात दिनांक १ एप्रिल 2020 पासून 20% वीजदर वाढ करण्यात आली आहे.राज्यातील जनतेजवळ पैसाच नसल्यामुळे विजेची मोठ्या प्रमाणात आलेली वीजबिल भरण्यास नागरिक असमर्थ आहेत. असे असतांनाच सरकारने बिल न भरू शकणाऱ्या जनतेला बिलावर व्याज पण लावत आहात. व वीज न भरल्यास वीज खंडित करीत आहात. जे अन्यायकारक व अमानवीय आहे.

             निवडणूक पूर्वी राज्यातील जनतेला वचन दिले होते की,आमचे सरकार आल्यास आम्हीं ३०० युनिट घरघुती वीज वापरावर 30% स्वस्त वीज देऊ,तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी च्या शपथ-नाम्याप्रमाणे औद्योगिक विजेचा दर अन्य राज्यांशी स्पर्धात्मक ठेवण्यासाठीचे आश्वासन देण्यात आले होते. यापुढेंही महामारी दरम्यान राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी वीजबिल सवलत देऊन दिवाळी गिफ्ट देण्याची घोषणा केली होती. तर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे  उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांनी जनतेची वीज कापल्या जाणार नाही अशी घोषणा केली होती. या सर्व घटनामुळे राज्यातील आर्थिक संकटात सापडलेली जनता आणखीच संभ्रमात पडली आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे असल्यामुळे आपल्या वचन नाम्याप्रमाणे ३०% वीज स्वस्त करणार ही अपेक्षा आहे.

            आपणास हाथ जोडून विनंती आहे की, हा मुद्दा अधिक न तानता आर्थिक कोंडी झालेल्या सामान्य घरघुती मीटर धारकांना आणि शेतकऱ्यांना तातडीने सवलत देऊन आपली वचन पूर्ती करावी. तसेच राज्यातील शेतकरी सुद्धा लॉकडाऊन आणि आस्मानी संकटात अडकला आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी आणलेली योजना निकामी आहे. कुणीही शेतकरी आता रक्कम भरुच शकत नाही. त्यामुळे त्यांना पूर्ण माफी देणे गरजेचे आहे.

            आपणास माहीतच आहे कि दिल्ली मध्ये  अरविंद केजरीवाल सरकार मागील सहा वर्षांपासून २०० युनिट वीज मोफत आणि ४०० युनिट वीज वापर करणार्यांना ५०% विजबिलात सूट देत आहे. त्यामुळे हा मुद्दा घेऊन राज्यात गेल्या ९ महिन्यापासून सातत्याने पाठपुरावा व आंदोलन करीत आहे.


 प्रमुख मागण्या खालील प्रमाणे आहेत.

१) आपल्या ३०% स्वस्त वीज देण्याच्या वचननाम्याची पूर्तता करावी.

२) कोव्हीड १९ दरम्यानचे मार्च ते ऑगस्ट या महिन्याचे २०० युनिट वीजबिल माफ करावे.

३) मार्च २०२० ते मार्च २०२१ या काळातील थकीतवर कोणत्याही प्रकारचे व्याज लावू नये आणि वीज कनेक्शन कापण्यात येऊ नये.

४) शेतकऱ्यांना सरसकट वीजबिल माफ करण्यात यावे.

५) वीज कंपन्यांचे #CAG तर्फे ऑडिट करण्यात यावे.

६) दिनांक १ एप्रिल २०२० पासून केलेली वीजदर वाढ मागे घेण्यात यावी.

         आपण राज्यातील जनतेच्या सहनशक्तीचा अंत न पाहता वरील मागण्या येत्या १५ दिवसात निकाली काढाव्यात अन्यथा नाईलाजास्तव आम आदमी पार्टी राज्याचे प्रमुख या नात्याने वचन पुर्तीसाठी आपल्या निवासस्थाना बाहेर सोमवार दिनांक १९ एप्रिल २०२१ रोजी सत्याग्रह करावा लागणार आहे. 

असे आम आदमी पक्ष महाराष्ट्र संयोजक तर्फे संघटनमंत्री सुनील रत्नाकर भोयर,संयोजक- प्रशांत येरने, सचिव राजू कुडे, सहसंयोजक  सिकंदर सागोरे-बबन कृष्णपल्लीवार- योगेश आपटे,कोषाध्यक्ष  अशोक आनंदे, संहसचिव  अजय डुकरे,सोशल मीडिया प्रभारी  राजेश चेडगुलवार, महिला आघाडी  देविका देशकर,  वर्षा सुनील भोयर,मीडिया-संदीप तुरक्याल, ऑटो विंग अमजदभाई, जेष्ट नागरिक  मधुकर साखरकर, वामनराव नांदूरकर यांनी संयुक्तपणे कळविले आहे.



Previous Post Next Post