अन्यथा आंबेडकरी जनता रसत्यावर उतरल्या शिवाय राहनार नाही - अमर धोगड़े (शहर अध्यक्ष - भिम आर्मी)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती निमत्य बल्लारशाह शहरात मिरवणूक व विविध कार्यक्रमास शासनाचे शासनाचे नियम लावून परवानगी देण्यात यावी.
(विदर्भ माझा न्युज 24),बल्लारशाह :- बल्लारशाह शहरात १४ एप्रील २०२१ रोजी माहामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमीत्य बल्लारशाह शहरात मिरवनूक व विविध कार्यक्रमासाढी परवानगी देण्या बाबद भिम आर्मी चे बल्लारशाह शहर अध्यक्ष अमर धोगड़े यांनी भीम आर्मी महानगर प्रमुख चंद्रपुर प्रशांत रामटेके यांच्या मार्गदशनाखाली जिल्हा अधीकारी यांना निवेदनातुण मागनी केली आहे,
मागील एक वर्षा पासून कोवीड -१९ ची महामारी सुरु आहे त्याच कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी २०२० ची भीम जयंती कडक संचार बंदी असल्या मुळे साजरी करता आली नही, या वर्षी आपन कोवीड - १९ चे कारण पुढे करून जयंतीवर बंदी घालत आहात प्रतेक वेळी आपन नियमांची अट घालुन थाबवू शकत नाही, आपन जन भावनंची काळजी घेतली पाहीजे ज्यांना आजाराची भिती आहे त्यांनी सार्वजनीक ठीकानी येऊ नये वजे लोक नियमांचे पालन करून जर जयंती साजरी करत असतील तर त्यांना अडवीने हे चुकीचे आहे, करीता आपन बल्लारशाह शहरात होणार्या १३० व्या भिम जयंतीसाढी नियम व अटी लावून मीरवनूक व विविध कार्यक्रमा साढी परवानगी द्यावी अन्यथा आंबेडकरी जनता रसत्यावर उतरल्या शिवाय राहनार नाही, व होणार्या परीणामाची जवाबदारी जिल्हा आधीकारी या नात्याने आपली राहील, असे ही या निवेदणात भिम आर्मीचे शहर अध्यक्ष अमर धोगड़े यांनी म्हनटले आहे, या वेळी शहर उपाध्यक्ष बबलु करमनकर , सुयोग खोब्रागडे , कमलेश अलोन , नीरज शेंडे , रोहित मेश्राम , शुभम अलोन , नीलेश गायकवाड़ , अनिकेत ताकसांडे, सिद्धार्थ देशभ्रतार , बादल ताकसांडे , साहिल गायकवाड़ , सुदेश शिंगाड़े , चेतन तेलतुम्बळे , अजित पडवेकर , विकास गोंडाने , यश देवगड़े , संस्कार सुखदेव ई.भीम आर्मी कार्यकर्ता उपस्थित होते.

