Top News

बल्लारशाह नगरपालिकेतील झोपलेल्या प्रशासनाला जाग येणार तरी कधी..? - सारंग कुमरे (अध्यक्ष गों.वि.स चांदागड)

 बल्लारशाह नगरपालिकेतील झोपलेल्या प्रशासनाला जाग येणार तरी कधी..? - सारंग कुमरे (अध्यक्ष गों.वि.स चांदागड)


गोंडराजे महाराजे खांडक्या बल्लाळशाह आत्राम यांचा अस्तित्व मिटवण्याचा ढोंगी बाबाचा प्रकार...

              

     


  (विदर्भ माझा न्युज 24) :- चांदा :-  चांदा (चंद्रपुर) जिल्ह्याचा इतिहास पाहता पूर्वी गोंड साम्राज्याची पहीली ‌राजधानी शिरपुर यू होती १३व्या शतकात खांडक्या बल्लाळशाहराजे आत्राम यांनी राजधानी शिरपुर वरून बल्लारशाह गडावर स्थापन केली, तर चांदागड (चंद्रपुर) ही चांदा गोंडराज्याची तीसरी राजधानी राहिली आहे बल्लारशाह हे शहर  ऐतिहासिक गोंडराजे खांडक्या बल्लाळशाह राजे यांनी‌ स्थापन केले ली नगरी म्हणून प्रख्यात आहे इथे गोंडराजांची अधिसत्ता राहिली आहे,


गोंडराजांनी या शहरावर आपली हुकूमत चालविली या शहराची निर्मिति गोंडराजे महाराजे खांडक्या बल्लाळशहा आत्राम यांनी इ.स 1247 मधे केली म्हणूनच राजे खांडक्या बल्लाळशहा आत्राम यांच्या नावा वरुण या शहराच नाव बल्लारशाह ठेवण्यात आल आहे..


     याच शहरात महाराजे खांडक्या बल्लाळशहा यांची समाधि आहे येथे. काही दिवसा पासुन राजे खांडक्या बल्लाळशहा यांच्या समाधि स्थळावर चंद्रमा प्रसाद मिश्रा नावाचा ढोंगी बाबा आपली दुकानदारी करत आहे देवी-देवतांची फोटो, चैत्र नवरात्रचे घटस्थापना, लोकांकडून चंदा जमा करने पूजा अर्चना करून सर्रास खांडक्या बल्लाळशहा महाराजांचा अस्थित्व-इतिहास मिटविण्याच काम तो करत आहे...


     गोंडराजांच्या समाधि कडे तेथील प्रशासनाच दुर्लक्ष का..? बल्लारशाह नगरपालिका प्रशासन झोपण्याच ढोंग करून समाधि कडे दुर्लक्ष तर करत नाहीत ना!? अशे अनेक प्रश्न गोंड समाजा समोर येत आहेत गोंड समाज हा शांति च्या मार्गाने चालणारा समाज आहे त्या समाजाला डिवचण्याच कार्य प्रशासना ने करू नये त्याकरिता येत्या 10 दिवसाच्या आत तेथील प्रस्थापित प्रशासनाने आणि पुरातन विभागाने खांडक्या बल्लाळशहा महाराजांच्या समाधि स्थळा कडे लक्ष देऊन चंद्रमा प्रसाद मिश्रा नावाच्या ढोंगी बाबाची दुकानदारी हटवावी आणी


त्याला तात्काळ अटक करावी नाही तर गोंडवाना विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरून आक्रोश चक्का जाम आंदोलन छेडनार आणि आपल्या स्टाईलने  ढोंगी बाबाची चमळी उतरविल्या शिवाय राहणार नाही याची पूर्ण जवाबदारी ही तेथील प्रशासनाची राहील याची प्रशासनाने दखल घ्यावी...असा इशारा गोंडवाना विद्यार्थी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष सारंग कुमरे, सचिव पलाश पेंदाम, गणपत नैताम, गणेश आत्राम, यांनी दिला...

 तेथील शासन-प्रशासन व पुरातन विभागाच्या निष्काळजीपणा मुळे तेथे हा प्रकार चालू आहे या प्रकारचा संपूर्ण गोंड समाज व विद्यार्थी संघटना जाहिर निषेध करत आहे... -  सांगर कुमरे



Previous Post Next Post