Top News

बल्लारशाह शहरात शिवसेने तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी.

 बल्लारशाह शहरात शिवसेने तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी.





(विदर्भ माझा न्युज 24)बल्लारशाह :- आज दिनांक 31 मार्च रोजी बुधवारी छत्रपति शिवाजी महाराजांची जयंती तिथी प्रमाने शिव सेना उपजिल्हा प्रमुख व नगरसेवक सिक्की यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरी करण्यात आली। सदर कार्यक्रम तालुका प्रमुख प्रकाश पाठक   यांच्या मार्गदर्शनाखाली व  शहर प्रमुख बाबा शाहू यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। सर्वप्रथम नगर परिषद परिसर सुंदर आकर्षक रांगोळी ने सुसज्जीत करून छत्रपती शिवाजी महाराज व स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून ग्रामीण रुग्णालय बल्लारशाह इथे फळ, बिस्किटे, वाटप करून नगरपरिषद चौकात शरबत व महाप्रसाद वितरण करण्यात आले। 


कार्यक्रमाचा सफलतार्थ प्रामुख्याने कमलेश बुग्गावार उप तालुका प्रमुख, प्रदीप गेडाम युवासेना उपजिल्हा प्रमुख, प्रभाकर मुरकुटे अनुदान योजना समिती सदस्य, शेख युसूफ उपशहर प्रमुख व अनुदान योजना समिती सदस्य, कल्पना  गोरघाटे महिला उप जिल्हाप्रमुख,सुवर्णा मुरकुटे महिला तालुका प्रमुख , ज्योती  गेहलोत महिला शहर प्रमुख,  रंजीता  बीरे नगरसेविका, नीरज यादव युवा सेना,प्रणय काकडे युवासेना, फिरोज खान उप शहर प्रमुख, रामू मेदरवार उप शहर प्रमुख, बॉबी कादासी उप शहर प्रमुख, सुरेंद्र संधू उप शहर प्रमुख बल्लारपुर, सोनु श्रीवास युवा सेना, गौरव नाडमवार, प्रविण मेश्राम, आशीष, प्रदीप, राहुल, बादल क्रिष्णकांत, प्रकाश, रमेश इतर शिवसेना पदाधिकारी,महिला आघाडी, युवासेना व कार्यकर्त्यांनी आपली उपस्थिती दर्शवली।



Previous Post Next Post