Top News

इंजि. राकेश सोमानी यांच्या कर्तव्य तत्परते बद्दल सर्व सामान्य जनतेतून यांचं अभिनंदन होत आहे.

 इंजि. राकेश सोमानी यांच्या कर्तव्य तत्परते बद्दल सर्व सामान्य जनतेतून यांचं अभिनंदन होत आहे.


बल्लारशाह शहरातील गांधी वॉर्ड येथुन एक तीन चाकी सायकल गेली चोरीला.




( विदर्भ माझा न्युज 24 ) बल्लारशाह :-  बल्लारशाह शहरातील गांधी वॉर्ड येथुन एक तीन चाकी सायकल चोरी गेलीली सायकल एका दिवसात मालकाच्या ताब्यात देण्यात गांधी वॉर्ड येथील इंजि. राकेश सोमानी यांना यश आले आहे. त्यामुळे यांच्या कर्तव्य तत्परते बद्दल सर्व सामान्य जनतेतून यांचं अभिनंदन होत आहे.



    सविस्तर वृत्त असे की बल्लारशाह येथील  तीन चाकी सायकल चालक अशोक भाऊ हे नेहमी प्रमाणे आपले काम करून रात्रौ घरी आले नेहमी च्या ठिकाणी त्यांनी सायकल लावली व झोपले त्याच रात्री 1 वाजता काही  चोरांनी साइकल चोरून नेल्याच त्यांचा लक्षात आले. काही वेळ शोधा शोध करून देखील हाती काहीच न आल्याचे  लक्षात आल्यानंतर निराक्ष होऊन अशोक भाऊ यांनी मदती करीता इंजि. राकेश सोमानी यांना सांगितले.



या वरून सोमानी व त्यांच्या समाज सेवा करणाऱ्या मित्रांच्या मदतीने सायकल शोधून काढण्यात यश आले व त्यांनी ती सायकल ,सायकल मालकाच्या हवाले केली.सायकल मालकांनी राकेश सोमानी यांचे खूप खूप आभार व्यक्त केले,व आज ही माणुसकी जिवंत आहे अश्या शब्दात त्यांचे कौतुक करण्यात आले,तर या कर्तव्य तत्परते बद्दल सर्व सामान्य जनतेतून राकेश सोमानी यांचं अभिनंदन होत आहे.

Previous Post Next Post