माहीती अधीकार व पत्रकार संरक्षन समिती शाखा बल्लारशाह तर्फे तहसीलदार यांना निवेदण.
लाॅकडाऊन काळापासुन महावितरन कंपनीच्या चालू असलेल्या मनमानी व तघुलकी कारभारा संदर्भात माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती तर्फे संपूर्ण महाराष्ट्रातून जिल्हा अधिकाऱ्यांना व तहसीलदारांना निवेद.
( विदर्भ माझा न्युज 24 ) बल्लारशाह :- दि.३०/३/२०२१ ला माहीती अधीकार व पत्रकार संरक्षण समिती चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक कांबळे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महेश सारणीकर,राष्ट्रीय महासचीव कमलेश शेवाळे यांच्या आदेशाने संपुर्ण महाराष्ट्रातील जिल्हा,तालुका,शहराच्या पदाधीकार्यांनी जिल्हा अधीकारी व तहसीलदार मार्फत निवेदण दीले आहे, तर चांदा जिल्हा अध्यक्ष सुदाम राठोड,शहर अध्यक्ष योगेश मुरेकार यांच्या नेतृत्वात लाॅकडाऊन काळापासुन महावितरन कंपनीच्या चालू असलेल्या मनमानी व तघुलकी कारभारा संदर्भात बल्लारशाह चे तालुका अध्यक्ष पराग गुंडेवार यांनी तहसीलदार संजय राईंचवार यांचा मार्फत निवेदण दीले आहे, लॉकडाउन काळापासून महावितरण कंपनीने वीज ग्राहकांना अव्वाचा सव्वा बिल देऊन शॉक दिला. व या
जास्तीचा बिला मूळ व मनमानी काभारामुळे जनसामान्यांच्या माथ्यावर भरमसाठ बिल लादल्या गेले आहे.कित्तेक ग्राहकांच्या विजेचा वापर कमी आहे पण त्यांना वीजबिल प्रमाणापेक्षा ही जास्त येत आहे.वीज वितरण कंपनी ग्राहकांना लुटत आहे.
![]() |
| चांदा जिल्हा अध्यक्ष सुदाम राठोड,शहर अध्यक्ष योगेश मुरेकार यांच्या नेतृत्वात चांदा इथे जिल्हा अधीकारी अजय गुल्हाने यांना निवेदण देण्यात आले. |
मागील वर्षी कडक लॉक डाऊन होते आणि त्यातून कुठे आता जनता सावरत आहे तर पुन्हा कडक निर्बंध घातले आहे.आणी त्याताच महावितरण कंपनीच्या ह्या मनमानी कारभारामुळे जन सामन्याचे कंबरडे मोडले आहे.तसेच शेतकऱ्यांनाही आवाजवी बिले आकारणी केली आहेत.रात्री अपरात्री कधीही महावितरणच्या कर्मचारी शेतकऱ्यांचा आणि सर्व सामान्य जनतेला कोणतीही पूर्व सूचना न देता वीजपुरवठा खंडित करत आहेत तसेच सावकारी पद्धतीने वीजबिल वसुली करत आहे.शेतकरी आणि सर्वसामान्य जनता हे जास्तीचे बिल भरण्यास असमर्थ असल्यामुळे लॉकडाऊन पूर्वी जितकी बिल होती तितकी द्यावी व सावकारी पद्धतीने वसुली थांबवावी.
जनता हवालदिल होऊन त्यांचे अतोनात नुकसान होत आहे,तरी यावर आपण शासनाचा दुआ म्हणून शासनाकडे आमची मागणी मांडून लवकरच निर्णय घेऊन सर्व सामान्य जनता आणि शेतकरी यांना न्याय दयवा आणि महावितरणच्या मुजोर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अन्यथा भविष्यात आमच्या समिती मार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील महावितरण कंपनीच्या विरोधात व्यापक जन आंदोलन करण्यात येईल. असे या निवेदनात म्हंटले आहे. या वेळेस संजय घुगलोत,संदीप केशकर,रोहन कळसकर उपस्थीत होते.


