परत लाॅकडाऊन लावायचा असेल तर सरकारने अगोदर उपाययोजना करून मग निर्णय घ्यावा- जाकीर हुसैन
(विदर्भ माझा न्युज 24) माहूर :- लाॅकडाऊन लावायचा असेल तर सरकारने अगोदर उपाययोजना करून मग निर्णय घ्यावा- जाकीर हुसैन कोरोना संकटावर उपाययोजना करायला केंद्र तथा राज्य सरकार अपयशी ठरले आहेत यवतमाळ : आज लॉकडॉऊनला एक वर्ष पूर्ण होतंय.....संपूर्ण वर्षभरात पाहायला गेले तर एक गोष्ट नक्कीच लक्षात येते की ती म्हणजे गोरगरीब, अन सर्वसामान्य लोकांचे हाल झाले होते.... यात कित्येक लोंकांचे रोजगार बुडीत गेले होते तर कित्येक लोंकांचे छोटे मोठे व्यवसाय बंद पडून उपासमार ची वेळ आली होती, तसं पाहायला गेलं तर एकंदरीत हे संकट जरी वैश्विक संकट असलं तरी यावर मात करायची जबाबदारी अश्या वेळी पूर्णपणे सरकार ची असते जे की केंद्रीय तसेच राज्य सरकार दोन्ही यावर उपाययोजना करायला सपशेल अपयशी ठरले आहेत हे मान्यच करावे लागेल,कोणत्याही सरकार चे याबाबत समर्थन करण्याऐवजी एकदा स्वतः वर ओढवलेल्या संकटांचा विचार करूनच बोलावे सध्या अजूनही परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे हे लक्षात येतेय, परत एकदा लॉकडॉऊन जर लावले तर लोकांचे अक्षरशः कंबरडे मोडल्या सारखे होईल, त्यामुळे सरकार ने अगोदर उपाययोजना तयार करूनच मंगच निर्णय घ्यावा अन्यथा लई अवघड होऊन बसेल असं मला तरी वाटतंय.
