भद्रावती शहर होत आहे काळ्या धंद्याचे माहेरघर - भारतीय ऑल मिडीया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया,भद्रावती.
(विदर्भ माझा न्युज 24)भद्रावती :- भद्रावती नगरीला देवनागरीचा दर्जा प्राप्त आहे. पण अलिकडे या नगरीत गल्लोगल्ली अवैद्य दारू व्यवसाय,सट्टा, जुगार,गांजा, ड्रग्स, सुगंधीत तंबाखू भंगार, रेती माफिया, गुटखा तस्करी ,गोमांस विक्री या काळ्या धंद्दांनी कळस गाठला असतानाच वेश्या व्यवसायाचीही
पायाभरणी केली जात आहे. भद्रावतीत वेश्या व्यवसायाचे रॅकेट सक्रिय असून काही समाजकंटकांनी हा व्यवसाय खुलेआम करण्यासाठी डोके वर काढले असून त्यांची हिम्मत वाढली आहे.त्यांना वेळीच ठेचून काढले नाहीतर देवनगरी भद्रावती चे पावित्र्य लवकरच संपणार आहे.
दारूचा तर महापूर आल्याचे चित्र पहावयास मिळत असुन
चांदा (चंद्रपूर) जिल्ह्यातील दारू बंदी उठली तर नाही ना? या प्रकारे गल्ली तर सोडा, आता तर मेन रोड वरील दुकाने फुलून दिसत आहेत.सचिन नामक व्यक्तीकडे तर आरामशीर खुर्चीवर बसून थंड पाण्याने थंड पाणी पिण्याची व्यवस्था केली आहे. दहिवलकर नामक व्यक्तीचा खुलेआम सट्टा व्यवसाय सुरू आहे .रात्री बारा वाजेपासून अवैधरित्या रेतीचा उपसा करण्यासाठी ट्रॅक्टर्स नागरिकांची झोपमोड करतात. भंगारवाले तर सरकारी जागेवर अतिक्रमण करून रोडवर कचरा जाळून परिसरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहेत.
सुगंधित तंबाखू वाले तर "मेरा कोण क्या बिघडता" या तोऱ्यात वावरत आहेत. गोमांस विक्री करणाऱ्यांना तर ना शासनाची ना प्रशासनाची भीती असून दिवसाआड बेछूट गोहत्या
केली जात आहे. सुमठाणा, गौराळा,हनुमान नगर इत्यादी अनेक भागात ड्रग्स, गांजा विक्री सर्रास सुरू असून यंग जनरेशन संपूर्णतः गांजाच्या आहारी गेली आहे. असे अनेक काळे धंदे तेजीत सुरू असुन कुणाच्या आशीर्वादाने हे धंदे सुरू आहेत? याला जबाबदार कोण? केंद्र शासन महाराष्ट्र शासन की स्थानिक प्रशासन या प्रश्नांचे उत्तर नागरिक शोधत आहेत.
दफ्तर दिरंगाई शासकीय कार्यालयांमध्ये वाढली आहे. शासकीय कार्यालयातील कर्मचारी जनतेशी मुजोरी ने वागताना दिसून येत आहेत. लवकर होणाऱ्या कामासाठी टाळाटाळ करतात व उडवाउडवीची उत्तरे देतात.
अशा तक्रारी भारतीय ऑल मिडीया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया भद्रावती कडे नागरिक करीत आहेत.
अशा आशयाचे निवेदन माननीय तहसीलदार भद्रावती यांचेकडे फोरम चे केंद्रीय महासचिव नागेंद्र चटपल्लीवार, जिल्हा महासचिव सुनिल रामटेके, भद्रावती वरोरा तालुका अध्यक्ष जितेंद्र गुलानी,
शहर अध्यक्ष सरफराज खान पठाण व सदस्य विजय सपकाळ यांनी निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे.


