चोरीच्या दुचाकीने अपघात, अपघातात वन्यप्राणी रोहि जागीच ठार.....
अपघातातील दुचाकीस्वार घटनास्थळावरून फरार.....
विदर्भ माझा न्युज 24 - आर्णी
आर्णी तालुक्यातील दक्षिण वनपरिक्षेत्र सावळी सदोबा अंतर्गत वर्तुळक्षेत्र अंजनखेड हद्दीतील भानसरा फाट्याजवळ आज सकाळी पहाटेच्या दरम्यान MH29-C-D3463 दुचाकीचा अपघात झाला,अपघातात वन्यप्राणी रोही जागीच ठार झाला,या संदर्भात वनविभागातील अधिकारी यांनी घटनास्थळी गेले असता, घटनास्थळावर दुचाकी क्रमांक MH29-C-D3463,युनिकॉन आढळून आली, घटनास्थळी आढळून आलेल्या दुचाकीच्या नंबर प्लेट वरून दुचाकीची चौकशी केली असता, दुचाकी बाहुद्दिन निजामुद्दीन शेख रा. जोडमोहा यांची असल्याचे निष्पन्न झाले,वन विभागातील अधिकाऱ्यांने दुचाकी मालक यांना दूरध्वनीवरून फोन करून गाडी संदर्भात विचारणा केली असता,सदर दुचाकी गाडी माझीच असून,28 मार्च रोजी रात्री माझ्या घरून दुचाकी व दोन मोबाईल फोन चोरी गेली असून,यासंदर्भात मी ग्रामीण पोलीस स्टेशन यवतमाळ येथे तक्रार दाखल केली आहे,असे दुचाकी मालकाकडून सांगण्यात आले,अपघात एवढ्या मोठ्या प्रमाणात झाला होता की वन्यप्राणी रोही हा जागी ठार झाला होता,मात्र अपघातातील दुचाकीस्वारकाचा अजून पत्ता लागलेला नाही,सदर घटनास्थळ अंजनखेड वर्तुळ क्षेत्रात येत असून या क्षेत्रातील वर्तुळक्षेत्र सहायकाने या प्रकरणाचा दोन तासातच छडा लावून दुचाकी मालकाचे नाव शोधून,घटनास्थळावर पोलिसांना पाचरण करून अपघातातील दुचाकी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली,अपघातात ठार झालेल्या वन्यप्राणी रोही यांची उत्तरीय तपासणी करुन,दफन करण्यात आले, अज्ञात विरुद्ध भारतीय वन्यजीव अधिनियमन 1972 अंतर्गत गुन्हा जारी करण्यात आला, पुढील तपास वर्तुळक्षेत्र अधिकारी अनंत कोरडे करीत आहेत,अपघातातील जखमी दुचाकीस्वार व दुचाकी चोर कोण आहे याचा तपास अद्याप लागलेला नाही,सदर कारवाई उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, सवस नितीन वानखडे,यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी चंदू गावंडे,वर्तुळ क्षेत्रसहायक अनंत कोरडे,वनरक्षक शंकर नाटकर,स्वाती अघम,प्रसाद मंजलवाड ,सागर आत्राम, रुपेश शेडमाके यांनी पार पाडली,
