Top News

नागभीड शहरात काॅंग्रेसला आमदार भांगडीया यांचा झटके पे झटका.....

नागभीड शहरात काॅंग्रेसला आमदार भांगडीया यांचा झटके पे झटका.....


काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी शहराध्यक्ष विजय ठाकरे यांच्यासह सहकाऱ्यांचा आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात प्रवेश....



 विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड

 दि. ३१ मार्च / आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत व नेतृत्वात नागभीड येथील जनसंपर्क कार्यालयात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी शहराध्यक्ष विजय ठाकरे यांच्यासह डॉ. देवानंद दुरबुळे, शशिकला ठाकरे, सुषमा ठाकरे, हेमंत ठाकरे, शुभम ठाकरे, मुखरू ठाकरे, विलास शास्त्रकार, गौरव समर्थ यांनी भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश घेतला. 

आत्मनिर्भर भारताचे प्रणेते  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये मोठ्या प्रमाणात देशाचा विकास होत आहे. सामान्य माणसाचा तसेच गरीब माणसाच्या कल्याणाचा अजेंडा आखला जात आहे. सामान्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करणाऱ्या कल्याणकारी योजना तयार होत आहे. 

विकसित भारताचा संकल्प पूर्ण होत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी शहराध्यक्ष विजय ठाकरे यांच्यासह डॉ. देवानंद दुरबुळे, शशिकला ठाकरे, सुषमा ठाकरे, हेमंत ठाकरे, शुभम ठाकरे, मुखरू ठाकरे, विलास शास्त्रकार, गौरव समर्थ यांनी  पंतप्रधान मोदी व भारतीय जनता पार्टीच्या विकसनशील ध्येय-धोरणांवर प्रभावित होऊन तसेच आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांच्या नेतृत्वात चिमूर विधानसभा क्षेत्राचा झालेला कायापालट व विकासकार्यावर, समाजकार्यावर विश्वास ठेवून भाजपात पक्षप्रवेश केला.

 यावेळी आमदार बंटी भांगडीया यांनी सर्वांच्या गळ्यात भाजपाचा दुपट्टा टाकून पक्षात सहर्ष स्वागत केले व अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या पक्षप्रवेशाप्रसंगी समस्त भाजपा नेते, पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post Next Post