Top News

विज कनेक्षन कापल्याने विज ग्राहकाचा वीज कार्यालया समोर आत्मदहनाचा प्रयत्न.

 विज कनेक्षन कापल्याने विज ग्राहकाचा वीज कार्यालया समोर आत्मदहनाचा प्रयत्न. 


विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी व पोलिसांनी त्यांना वाचवले.



( विदर्भ माझा न्युज 24 ),नागपुर :- जुनी मंगळवारी निवासी राजेश बंडे यांच्यावर 70 हजार वीज बिल थकीत होते मात्र  त्यांना महावितरण कळुण कोणतीही पूर्व सूचना न देता,  महावितरण च्या कर्मचाऱ्यांनी वीज खंडित केली, त्यामुळे संतापलेले राजेश बंडे हे महावितरण च्या वर्धमान नगर येथील कार्यकारी अभियंता कार्यालयात जाऊन अभियंता पराग फाटे व त्यांच्या अधिकाऱ्यांना वीज जोडून देण्याची विनंती केली, व त्यांना आपली हालाकीची परिस्थिती व लहान लहान मुली मुला बद्दल सांगितले, रात्र भर अंधारात पूर्ण परिवार कसा राहील म्हणून अधिकाऱ्या समोर लाईन जोडणी करता याचना केली परंतु अधिकाऱ्यांन कडुन त्यांना पहीले पैसे भरा नंतरच तुमची लाईन जोडू असे सांगण्यात आले असता राजेश बंडे यांनी बाहेर येऊन महावितरण व ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा निषेध करत कार्यालयाच्या बाहेर येऊन स्वतःच्या अंगावर मातीचे तेल टाकून घेतले व  आत्मदहाचा प्रयन्त केला असता, विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांना राजेश बंडे आत्मदहन करणार आहेत याची खबर लागताच त्यांना शोधत वर्धमान नगर येथील वीज कार्यालयात विराआंस कार्यकर्ते पोहचले असता तेथे राजेश बंडे यांनी स्वतःच्या अंगावर मातीचे तेल ओतून घेतले होते व माचीस ची काडी पेटून स्वतःला जाडनारच होते,  तेव्हाच विराआस कार्यकर्त्यांनी अचानक धडक देऊन त्याच्या हातातील माचीस ची डब्बी हिसकून बाजूला फेकली व त्यांच्या अंगावर पाणी टाकून पोलिसांन सोबत त्यांची समजूत काडून त्यांना वाचविन्यात यक्ष प्राप्त केले, लकडगंज पोलीस स्टेशन च्या पोलीस कर्मचार्यांनी राजेश बंडे यांना आपल्या ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेले, 

 राजेश बंडे यांची समस्या बद्दल कार्यकारी अभियंता यांच्याशी विदर्भ राज्य आंदोलन समिती चे नागपूर विभाग युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासूरकर,  व्यापारी आघाडी अध्यक्ष रवी भामोळे, वाहतूक आघाडी अध्यक्ष प्रशांत जयकुमार , ज्येष्ठ विदर्भवादि प्यारु भाई  यांनी कार्यकरी अभियंता पराग फाटे व त्यांचे उच्च अधिकारी यांना त्वरित लाईन जोडून देण्यास सांगितले, राजेश बंडे हा टिफिन पहूचवन्याचे कार्य करतो, त्याची इन्कम येवढी नाही कि तो 70 हजार वीज बिल भरू शकेल म्हणून आपण त्याच्या परिस्थिती व लहान मुलाबाळान कडे पाहून लाईन जोडन्यास सांगितले  व लाईन तोडण्याची मोहीम सुरु आहे, ही मोहीम येथेच  थांबविन्यात यावी कारण कोरोना ही महामारी सुरुच आहे व अश्यात रोजगार, व्यापार,  उदयोग धंदे अजूनही पूर्ण पणे सुरु झालेले नाही,जर महावितरण वीज तोडनी थांबवत नसेल तर विदर्भ राज्य आंदोलन समिती तीव्रतेने महावितरण कर्मचाऱ्यांचा प्रतिकार करेल, कारण वीज विदर्भात तैयार होते त्या करिता लागणारे संसाधन विदर्भाचे लागले म्हणून विदर्भातील जनतेचा विजेवर हक्क आहे असे विदर्भ माझा न्युज 24 सोबत बोलतांना  विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडी नागपूर विभाग अध्यक्ष  मुकेश मासुरकर  यांनी‌ सांगीतले.




 

Previous Post Next Post