Top News

राष्ट्रीय क्रांतिकारी विचार महासंघाचे मुख्य संयोजक रूस्तम शेख यांची मागणी रेशन दुकानात माहिती फलक लावा.

 राष्ट्रीय क्रांतिकारी विचार महासंघाचे मुख्य संयोजक रूस्तम शेख यांची मागणी रेशन दुकानात माहिती फलक लावा. 



(विदर्भ माझा न्युज 24)माहुर :- सार्वजनिक वितरण व्यवस्थे मध्ये पारदर्शक्ता राहावी तसेच ग्राहकाला योग्य माहिती मिळावी या करीता रेशन दुकानात लोकांना स्‍पष्‍टपणे वाचता येईल असा महिती फलक असला पाहिजे. या फलकावर दुकानाची वेळ, संबधीत विभागाच्या कार्यालयाचा पत्ता फोन नं , दुकान क्रमांक, सुटीचा दिवस ,तक्रार वही उपलब्‍ध असल्‍याची नोंद,  रेशन कार्ड संख्‍या, भाव व देय प्रमाण उपलब्‍ध कोटा , बीपिएल, अत्योदय , अन्नपुर्णा   लाभार्थीची यादी  इ माहिती असणे बंधनकारक आहे 

परंतु  यवतमाळ जिल्हयात बहुसंख्य रेशन दुकानात वरील माहिती असलेले फलक दुकानाच्या दर्शनी  भागावर लावलेले नाही त्यामुळे ग्राहक माहीती मिळण्या पासुन वंचित असुन ग्राहक कल्यान कायदयाचे उल्लघन होत आहे 

तरी ग्राहकाचे अधिकार अबाधीत राहावे त्यांना माहिती सहज मिळावी या करीता वरील माहिती असलेले फलक रेशन दुकानाच्या दर्शनी भागा वर लावण्या संबधी जिल्हाधिकारी साहेब  यवतमाळ यांनी निर्देश दयावे अशी विनंती राष्ट्रीय क्रांतीकारी विचार महासंघाचे मुख्यसंयोजक रूस्तम शेख यांनी केली आहे.







Previous Post Next Post