Top News

ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देऊन सोयी सुविधा उपलब्ध करा : राजु झोडे

 ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देऊन सोयी सुविधा उपलब्ध करा : राजु झोडे 


पोंभुर्णा प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या विळख्यात


 उलगुलान संघटनेनी तहसीलदारांना निवेदनातून केली मागणी




(विदर्भ माझा न्युज 24) पोंभुर्णा :- पोंभुर्णा तालुका हा आदिवासी बहुल मागास क्षेत्र म्हणून ओळख आहे. या क्षेत्राचे नेतृत्व तत्कालीन अर्थमंत्री विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार गेल्या दहा वर्षापासून करीत आहेत. या तालुक्यात विकास केला म्हणून मोठमोठ्या वल्गना केल्या होत्या. परंतु येथे आरोग्याची समस्या अजूनही सुटली नाही. या ठिकाणी रुग्णालयाची मोठी सुसज्ज इमारत बनली खरी मात्र अजूनही त्यात आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. अजूनही पोंभुर्णा तालुका आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळालेला नाही हे या तालुक्यातील नागरीकांचे दुर्भाग्यच आहे. हे प्राथमिक आरोग्य केंद्र मागील अनेक वर्षापासून विवीध समस्यांच्या विळख्यात सापडलेले असून आरोग्य केंद्रात अनेक सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे

येथील नागरीकांना आरोग्याच्या अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून, नागरीकांना आपल्या आरोग्याशी खेळ खेळला जावा लागतो आहे. त्यामुळे पोंभूर्णा प्राथमिक आरोग्य केंद्रात बाल रोग तज्ञ, महीला रोग तज्ञ, अस्थि रोग तज्ञ अशा

इतर डॉक्टरांसह २४ तास डॉक्टर उपलब्ध करावे व प्राथमिक आरोग्य केंद्रात सोनोग्रॉफी मशिन, एक्सेरे मशिन व पॅथॉलाजीस्ट उपलब्ध करावे आणि मागील

अनेक दिवसापासून मर्चूरी असून, सुद्धा शववच्छेदन होत नसल्याने मृत प्रेताच्या शविच्छेदनाकरीता तालूक्यापासून जवळपास ५० किलोमिटर अंतराव जावे लागते

आहे. त्यामूळे याचा नाहक त्रास व आर्थिक भुर्दंड नागरीकांना सहन करावा लागत आहे. त्याच बरोबर प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध व गोळ्यांचा तुटवडा नेहमीच होत असल्याने तो त्वरीत दुर करावा. वरील सर्व मागण्या त्वरीत सोडवून नागरीकांना

सोयी सुविधा उपलब्ध कराव्यात यासाठी उलगुलान संघटनेने पोंभुर्णा तहसीलदार यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.

या सर्व समस्याच्या विळख्यात असलेल्या प्राथमिक आरोग्य केद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देऊन नागरिकांच्या आरोग्याची होणारी हेळसांड न थांबवल्यास उलगुलान संघटनेच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्रात होत असलेल्या असुविधांच्या गैरसोयीच्या विरोधात तिव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा उलगुलान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजुभाऊ झोडे , रुपेश निमसरकार, उलगुलान संघटनेचे तालुका अध्यक्ष अंशुल मोरे, उपाध्यक्ष नितेश रामटेके, उपाध्यक्ष हिम्मतलाल मांडवगडे, महासचिव किशोर केमेकार, तालुका सचिव अमिन मेश्राम, आंनद झाडे, बालुभाऊ कावरे, अमित मोरे, विनोद संतोषवार, गौतम रामटेके, देवाजी देवगडे, अतुल भडके, रणपती वडस्कर, भाऊराव रामटेके आदी कार्यकर्त्यांनी दिला आहे.



Previous Post Next Post