Top News

अपंग दिनाचे औचित्य साधून दृष्टिहीन जनकल्याण बहुद्देशीय संस्था बल्लारपुर व विकलांग एकता शक्ति संगठन महाराष्ट्राचा संयुक्त विद्यमानाने अपंग दिन साजरा.

 अपंग दिनाचे औचित्य साधून दृष्टिहीन जनकल्याण बहुद्देशीय संस्था बल्लारपुर व विकलांग एकता शक्ति संगठन महाराष्ट्राचा संयुक्त विद्यमानाने अपंग दिन साजरा. 


(विदर्भ माझा न्यूज 24 प्रतिनिधि ),विसापूर :- विसापूर दि. 3 दिसंबर २०२० रोजी जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधुन दृष्टिहीन जनकल्याण बहुद्देशीय संस्था बल्लारपुर व विकलांग एकता शक्ति संगठन महाराष्ट्राचा संयुक्त विद्यमानाने अपंग दिन बल्लारपुर अंध मुलींचे वस्तिगृह येथे साजरा करण्यात आला. सोशल डिस्टेंसिंग चे पालन करत लुइस ब्रेल व हेलेन केलर यांचा प्रतिमेला पुष्पहार  अर्पण करून अंधाना अंधा काठीचे वाटप करुन अपंग दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश शिंदे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक  प्रदीप लांडगे यांनी केले

शिवसेना उपजिला प्रमुख व नगरसेवक सिक्की यादव यांच्या अध्यक्षतेखाली हे कार्यक्रम पार पडले तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुने म्हणून युसूफ भाई यांनी आपली उपस्थिती दर्शविली. दृष्टिहीन जनकल्याण संस्था चे अध्यक्ष दिलीप गेडाम व विकलांग एकता शक्ति संगठन चे अध्यक्ष दीपक वाकडे यांनी आपले मोलाचे मार्गदर्शन केले. या वेळी संध्या चौबे, सिद्धार्थ टिपले, प्रवीण घोगले, शालिनीताई रामटेके, इंद्रजीत भारद्वाज , राजू सुरमवर गणेश पुरे कर निर्दोष वाडके, रंजनाताई डोंगरे, सरलाताई गेडाम, अनिल बांगड़े, गोपाल शेंडे, इत्यादि सदस्यांनी आपली उपस्थिती दर्शविली.

Previous Post Next Post