लगाम व बोरी येथे धान खरेदी केंद्राचे उद्घाटन
मा.आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न
(विदर्भ माझा न्यूज 24 प्रतिनिध )वार्ता बोरी (लगाम):- हंगाम 2020-21 मध्ये शासकीय धान खरेदी केंद्र मंजूर झाले.असून थांब खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आले कोरोणा कोविड (१९) महामारीच्या काळात शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने धान्य खरेदी केंद्र सुरू करण्यात येत असून शेतकऱ्यांसमोर धान विक्रीसाठी मोठेमोठे समस्या उभ्या आहेत, या समस्यांचे निराकरण बोरी व लगाम येथील खरेदी केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी मा.आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्याशी हितगूज करताना शेतकऱ्यांनी आपली समस्या मांडली शेतकऱ्यांनी आपले धान इतरत्र विक्री न करता थेट खरेदी केंद्रावरच मालाची विक्री करावी संपूर्ण शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा,असे धान खरेदी केंद्राचा उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या समस्या बाबत प्रश्न मी शासन दरबारी ठेवून संपूर्ण प्रश्न निकाली काढून देईन असे यावेळी आश्वासन सुद्धा दिले गोविंदाची शेडमाके यांचे अध्यक्षतेखाली विशेष अतिथी म्हणून जिल्हा परिषद माजी अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम होत्या,प्रमुख पाहुणे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत भाऊ कुत्तरमारे, नागेश करमे,सुधाकर नैताम,दिलीप ओलालवार, लिंगा दुर्गे,विलास जमपवार दिवाकर, उराडे, साईनाथ गड्डमवार, विजय कोकिरवार रामगोनवार, देवाजी सिडाम, मनोहर मारटकर, नारायण पेंदाम, वासुदेव मडावी,बालाजी सिडाम,सत्यवान सिडाम, कालिदास कुसनाके, अक्षय सोयाम, महेश बाकीवार, विस्तारी गंगाधरीवार,तसेच याप्रसंगी गावातील असंख्य शेतकऱ्यांनी यावेळी उपस्थिती राहुन विविध समस्याचे निराकरण करून घेतले. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन अनिल गुरनूले यांनी केले
