Top News

Tiger Attack in Nagbhid : तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला; नागभीड तालुक्यात खळबळ

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला; नागभीड तालुक्यात खळबळ


नागभीड दि. १९ मे : चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात पुन्हा एकदा वाघाच्या हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. किटाडी मेंढा जवळील हनुमान मंदिर परिसरातील जंगलात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघळकीस आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, श्रीमती वनिता (इंदिरा) शंकर उईके (वय ५५) या मंगळवारी (दि.१९ मे) सकाळी अंदाजे ८.३० ते ९.०० वाजण्याच्या सुमारास वनविकास महामंडळाच्या कम्पार्टमेंट क्रमांक ६९ परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी गेल्या होत्या. याच दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे व पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा व पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.


या घटनेमुळे परिसरात  भीतीचे वातावरण निर्माण झाले असून जंगल परिसरात जाणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

श्रीमती वनिता (इंदिरा) शंकर उईके
यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻

        

Previous Post Next Post