Top News

Constitution Awareness Camp : बल्हारशाह मध्ये संविधान उद्देशिका वाटप व मतदार पुनर्निरीक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद


बाल्हारशाह | बल्हारशाह शहरातील प्रभाग क्रमांक १० मध्ये नगरसेवक सुमित (गोलू) डोहणे तथा नगरसेविका साजिया शाहिद शेख यांच्या सौजन्याने संविधान उद्देशिका वाटप तसेच मतदार यादी विशेष गहन पुनर्निरीक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाला नगर परिषद बल्लारपूरच्या नगराध्यक्षा डॉ. अलका अनिल वाढई, नगर परिषद उपाध्यक्ष देवेंद्र (पापा भैया) आर्य, तहसीलदार रेणुका कोकाटे, डॉ. अनिल वाढई, इंजि. राकेश सोमाणी यांच्यासह विविध प्रभागातील बीएलओ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिबिरादरम्यान नागरिकांना भारतीय संविधान उद्देशिकेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. तसेच मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया, नाव समाविष्ट करणे, दुरुस्ती व पडताळणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्रभागातील आनंद रामटेके, प्रा. कांबळे, अनिल सुखदेवे, विनोद वाळके, संजय शेलकर, अशोक कांबळे, हेमंत मानकर, शेख करीम, आनंद मेश्राम, जयंत दुर्गे, भारत बोम्मावार आणि फारुख भाई यांना संविधान उद्देशिकेचे वाटप करण्यात आले.


कार्यक्रमाला शाहिद शेख, रितेश अलोने, लालू शेंडे, रोशन बोम्मावार, शुभम लभाने, गौरव नाडमवार, परीस महाजनवार, संस्कार सुखदेवे, यश देवगडे, आरिफ खान, नंदू पाल, रिक्की कैथवास, लड्डू निमगडे, पवन तोकलवार, गौरव मेश्राम, मनीष सिडाम, तरुण देवराव, अक्षय रिंगणे आणि इर्शाद यांची उपस्थिती होती. मतदार जागरूकता आणि संविधानाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिराचे नागरिकांनी स्वागत केले.

Previous Post Next Post