Top News

MLC Election Schedule Announced : विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 18 जून रोजी मतदान

विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 18 जून रोजी मतदान


वर्धा – चंद्रपूर – गडचिरोली मतदारसंघात आचारसंहिता लागू




चंद्रपूर  : महाराष्ट्र विधान परिषदेच्या वर्धा – चंद्रपूर – गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. संबंधित सदस्य निवृत्त झाल्यामुळे ही सार्वत्रिक निवडणूक होत असून, 18 मे 2026 पासून या मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

भारत निवडणूक आयोगाने राज्यातील 16 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित केला असून, त्यामध्ये वर्धा – चंद्रपूर – गडचिरोली मतदारसंघाचाही समावेश आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

  • अधिसूचना प्रसिद्धी : 25 मे 2026
  • नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख : 1 जून 2026
  • नामनिर्देशन पत्र छाननी : 2 जून 2026
  • उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : 4 जून 2026
  • मतदान दिनांक : 18 जून 2026
  • मतदानाची वेळ : सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत
  • मतमोजणी : 22 जून 2026
  • निवडणूक प्रक्रिया समाप्ती : 25 जून 2026

जिल्हाधिकाऱ्यांकडे निवडणुकीची जबाबदारी

या निवडणुकीसाठी चंद्रपूर जिल्हाधिकारी यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली येथील निवासी उपजिल्हाधिकारी यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

977 पात्र मतदार करणार मतदान

वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांतील 40 स्थानिक स्वराज्य संस्थांमधील एकूण 977 पात्र मतदार मतपत्रिकेद्वारे मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांनी दिली आहे.

Previous Post Next Post