Top News

Crime Breaking : नात्याला काळिमा फासणाऱ्या नराधम नातेवाईकाला पोलिसांकडून बेड्या; ४ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, पोक्सोसह कडक कलमांन्वये गुन्हा दाखल

Crime Breaking : नात्याला काळिमा फासणाऱ्या नराधम नातेवाईकाला पोलिसांकडून बेड्या; ४ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, पोक्सोसह कडक कलमांन्वये गुन्हा दाखल





​नागभीड : नागभीड तालुक्यातून नात्याला काळिमा फासणारी आणि संपूर्ण परिसर हादरवून टाकणारी एक अत्यंत संतापजनक व मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका अवघ्या चार वर्षांच्या निरागस चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्याच एका १८ वर्षीय नातेवाईकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण नागभीड तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

​नागभीड पोलिसांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, मोजा बोंड येथील पीडित बालिकेच्या फिर्यादीने १८ मे २०२६ रोजी नागभीड पोलीस स्टेशन गाठून याप्रकरणी रीतसर तक्रार दाखल केली. संचित प्रवीण बगडे (वय १८ वर्षे, रा. बोंड) असे अटक करण्यात आलेल्या नराधम आरोपीचे नाव आहे. नातेवाईक असल्याने त्याचे पीडितेच्या घरात येणे-जाणे होते. या ओळखीचा आणि चिमुकलीच्या निरागसतेचा फायदा घेत आरोपीने तिला चॉकलेटचे आमिष दाखवले आणि  तिच्याच घरी नेऊन तिच्यावर पाशवी लैंगिक अत्याचार केला.

​पोलीसांची तात्काळ कारवाई न्यायालयात केले हजर

 फिर्यादीच्या तोंडी रिपोर्टवरून नागभीड पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने पावले उचलली. पोलिसांनी आरोपी संचित बगडे याच्याविरुद्ध अपराध क्र. २४२/२०२६ अन्वये, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४ (२)(i), ६५(२) सहकलम ४, ६ पोक्सो (POCSO) कायदा अंतर्गत कडक गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या असून आजच त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.

​वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू 

या संवेदनशील आणि गंभीर गुन्ह्याचा पुढील तपास चिमूर अतिरिक्त चार्ज उपविभाग (ब्रह्मपुरी) चे उपविभागीय पोलीस अधिकारी  दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली, नागभीड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक (स.पो.नी) दिलीप पोटभरे अत्यंत गांभीर्याने करत आहेत.

Previous Post Next Post