Top News

नागभीडमध्ये अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांचा छापा ; १ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त

 नागभीडमध्ये अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांचा छापा ; १ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त


स्थानिक गुन्हे शाखा व ब्रम्हपुरी उपविभाग पथकाची संयुक्त कारवाई ; दोन आरोपी ताब्यात, एक फरार




नागभीड येथे अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १ लाख १८ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी नागभीड पोलीस स्टेशन येथे कलम कलम ६५ (अ), ८३ अप.क्र. २३४/२६ नुसार गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. १६ मे २०२६ रोजी मौजा नागभीड परिसरात अवैध दारू वाहतूक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ब्रम्हपुरी उपविभाग पथक व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी संयुक्त कारवाई करत छापा टाकला. या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला.

या प्रकरणी पवन देवचंद दुधे (रा. कोथुळणा, ता. नागभीड) व अक्षय गजानन तुपकर (रा. मिंडाळा, ता. नागभीड) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली असून मालारेड्डी नरेडला (रा. नागभीड) हा आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.


जप्त करण्यात आलेला मुद्देमाल :

  • 300 नग (3 पेटी) रॉकेट देशी दारू संत्रा 90 मि.ली. — किंमत 12 हजार रुपये
  • 128 नग सखु संत्रा टॅगो प्रिमियम 90 मि.ली. — किंमत 5 हजार 120 रुपये
  • 74 नग देशी दारू प्रिमियम 90 मि.ली. — किंमत 2 हजार 960 रुपये
  • 72 नग सखु संत्रा टॅगो प्रिमियम 180 मि.ली. — किंमत 5 हजार 760 रुपये
  • 57 नग सौंफ डिलक्स 90 मि.ली. — किंमत 2 हजार 280 रुपये
  • 19 नग Officer’s Choice Blue 180 मि.ली. विदेशी दारू — किंमत 4 हजार 180 रुपये
  • 18 नग Mc Dowells No.1 180 मि.ली. विदेशी दारू — किंमत 3 हजार 780 रुपये
  • 8 नग BARREL 24 180 मि.ली. विदेशी दारू — किंमत 1 हजार 280 रुपये
  • 6 नग सहेंद्री गोल्ड 180 मि.ली. विदेशी दारू — किंमत 1 हजार 80 रुपये
  • दारू वाहतुकीसाठी वापरलेली Hero Destiny मोपेड (MH 34 CK 4062) — किंमत 80 हजार रुपये


पोलिसांनी या कारवाईत एकूण १,१८,४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपींविरुद्ध कलम ६५ (अ), ८३  अप.क्र. २३४/२६ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ही कारवाई ब्रम्हपुरी उपविभाग पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांच्या संयुक्त पथकाने केली.

Previous Post Next Post