Railway Technician Recruitment 2026 : रेल्वेत 6 हजारांहून अधिक पदांची मेगा भरती, 30 जूनपासून अर्ज सुरू
सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अर्थात RRB मार्फत टेक्निशियन पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. देशभरातील विविध रेल्वे झोनमध्ये तब्बल 6 हजारांहून अधिक रिक्त पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांना 30 जून 2026 पासून ऑनलाइन अर्ज करता येणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 जुलै 2026 असेल.
किती पदांवर भरती होणार?
या भरती प्रक्रियेमध्ये टेक्निशियन ग्रेड-1 आणि टेक्निशियन ग्रेड-2 या पदांचा समावेश आहे.
- टेक्निशियन ग्रेड-1 : 352 पदे
- टेक्निशियन ग्रेड-2 : 6242 पदे
एकूण 6594 पदांसाठी ही भरती होणार आहे.
शैक्षणिक पात्रता
टेक्निशियन ग्रेड-1
- उमेदवाराचे वय 18 ते 33 वर्षांदरम्यान असावे.
- फिजिक्स, कॉम्प्युटर सायन्स किंवा आयटी शाखेत पदवी आवश्यक.
टेक्निशियन ग्रेड-2
- उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षांदरम्यान असावे.
- संबंधित तांत्रिक पात्रता आवश्यक राहणार आहे.
झोननिहाय रिक्त पदांची माहिती
- सेंट्रल रेल्वे, मुंबई – 870
- साउदर्न रेल्वे, चेन्नई – 785
- नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वे, गुवाहाटी – 701
- साउथ ईस्टर्न रेल्वे, कोलकाता – 576
- नॉर्दर्न रेल्वे, नवी दिल्ली – 548
- वेस्टर्न रेल्वे, मुंबई – 544
- साउथ सेंट्रल रेल्वे, सिकंदराबाद – 368
- ईस्टर्न रेल्वे, कोलकाता – 291
- नॉर्थ सेंट्रल रेल्वे – 268
- साउथ वेस्टर्न रेल्वे, हुबळी – 240
- वेस्ट सेंट्रल रेल्वे, जबलपूर – 231
- नॉर्थ वेस्टर्न रेल्वे, जयपूर – 199
- ईस्ट सेंट्रल रेल्वे, हाजीपूर – 186
- नॉर्थ ईस्टर्न रेल्वे, गोरखपूर – 169
- साउथ ईस्ट रेल्वे, बिलासपूर – 90
- प्रोडक्शन युनिट (BLW/CLW/ICF) – 499
अर्ज शुल्क किती?
RRB टेक्निशियन भरतीसाठी अर्ज करताना खालीलप्रमाणे शुल्क आकारले जाणार आहे.
- सामान्य, OBC आणि EWS प्रवर्ग : ₹500
- SC/ST उमेदवार : ₹250
- सर्व महिला उमेदवार : ₹250
अर्जामध्ये दुरुस्ती करण्यासाठी अतिरिक्त ₹250 शुल्क भरावे लागणार आहे. शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरता येईल.
निवड प्रक्रिया कशी असेल?
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाईल.
1. CBT (Computer Based Test) परीक्षा
2. कागदपत्र पडताळणी
3. वैद्यकीय तपासणी
4. अंतिम गुणवत्ता यादी
अर्ज कधीपासून सुरू?
- अर्ज सुरू होण्याची तारीख : 30 जून 2026
- अर्ज करण्याची अंतिम तारीख : 29 जुलै 2026
रेल्वेत सरकारी नोकरी मिळवण्याची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे. इच्छुकांनी अधिकृत नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून वेळेत अर्ज करावा.
