Swadhar Scheme Applicants Asked to Complete Errors : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटींची पूर्तता करण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 19 : सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ज्या विद्यार्थ्यांच्या अर्जामध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत, त्यांनी तात्काळ आवश्यक पूर्तता करावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाकडून करण्यात आले आहे.
अपूर्ण अथवा त्रुटी असलेले अर्ज 30 मे 2026 रोजी अपात्र घोषित करण्यात येणार असल्याची माहिती सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी दिली आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अर्जातील त्रुटींची पूर्तता केलेली नाही, त्यांनी अर्जाची सुधारित प्रत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने 30 मेपूर्वी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चंद्रपूर येथे कार्यालयीन वेळेत सादर करावी.
30 मेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
30 मे 2026 पर्यंत अर्जाची ऑनलाइन व ऑफलाइन प्रत सादर न करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागेल. याची सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर तसेच http://www.acswchandrapur.in येथे प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी दिली.
