बल्हारशाह पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांच्या सह जिल्हातील अन्य ३ पोलिस निरक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या......
तर 4 नवीन पोलिस निरीक्षक जिल्ह्यात होणार दाखल....
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह
विशेष पोलिस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांच्या दिनांक 30/12/2022 च्या पोलिस निरीक्षकांच्या बदल्या संदर्भात 8860/2022 च्या पत्रानुसार विहित कालावधी पुर्ण झालेल्या निशस्त्र पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आलेल्या असून यानुसार चंद्रपुर जिल्ह्यातील 4 पोलिस निरीक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या झालेल्या असून उमेश नागोराव पाटील, पोलिस निरीक्षक बल्हारशाह व प्रदीपकुमार पंढरीनाथ शेवाळे, चंद्रपुर यांची नागपूर ग्रामीण मध्ये बदली करण्यात आली आहे.
हे ही वाचा 👉🏻 अबब्......गावात अंगणवाडीच नाही...अंगणवाडी सेविकेच्या घरीच भरते अंगणवाडी......
यासोबत स्वप्नील धोंडीराम धुळे पोलिस निरीक्षक, दुर्गापूर यांची भंडारा व सत्यजित शशिकांत आमले पोलिस निरीक्षक गडचांदूर यांची वर्धा येथे बदली झाली असल्याची माहीती असून, चंद्रपुर जिल्ह्यात 4 नवीन पोलिस निरीक्षक दाखल होत आहे. सूत्रांच्या माहीती नुसार नागपूर ग्रामीण येथून चंद्रकांत राजमळ काळे व असिफराजा बख्तावर शेख यांची चंद्रपुर जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे.
हे ही वाचा 👉🏻 अबब्......गावात अंगणवाडीच नाही...अंगणवाडी सेविकेच्या घरीच भरते अंगणवाडी......
सहाय्यक पोलिस निरीक्षकांमध्ये सदाशिव ढाकणे वर्धा,अनिल आळंदे वर्धा,विनीत घागे वर्धा तर संतोष दरेकर यांची बदली वर्धा जिल्हात करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक दिलीप लोखंडे व अनिल मालेकर यांच्या बदलीला स्थगीती तर राजकुमार मडावी व किरण मेश्राम यांची बदली भंडारा जिल्हात करण्यात आली आहे. नागपूर ग्रामीन व भंडारा जिल्हातुन चंद्रपूर जिल्हात नव्याने रूजू होणारे पोलिस निरीक्षक आसीफराजा शेख,अनिल जिट्टावार,मनोहर कोरटी,शिवाजी कदम यांचा सयावेश आहे.
हे ही वाचा 👉🏻 अबब्......गावात अंगणवाडीच नाही...अंगणवाडी सेविकेच्या घरीच भरते अंगणवाडी......
वर्धा जिल्हातुन चंद्रपूरात येणारे सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून जितेंद्र चांदे,सचिन यादव व सपना निरंजने रूजू होनार आहे. वर्धा व भंडारा जिल्हातुन चंद्रपूरात येनारे पोलिस उपनिरीक्षक म्हणून नंदकीशोर खेकाडे, पपिन रामटेके व रविंद्र रेवतकर यांचा समावेश आहे.
हे ही वाचा 👉🏻 अबब्......गावात अंगणवाडीच नाही...अंगणवाडी सेविकेच्या घरीच भरते अंगणवाडी......
पोलिस निरीक्षकांच्या बदल्या संदर्भात पोलिस निरीक्षकांची नावे...
1) आसिफराजा भक्तावर शेख, नागपूर ग्रामीण येथून चंद्रपूर बदली
2) चंद्रकांत राजमळ काळे, नागपूर ग्रामीण येथून भंडारा बदली
3) अनिल मोहन रेड्डी जिट्टावार, नागपुर ग्रामीण येथून चंद्रपुर बदली
4) निलेश महादेवराव ब्राह्मणे , वर्धा येथून भंडारा बदली
5) राजेंद्र त्रंबक शेटे, वर्धा, दोन महिन्यात सेवानिवृत्त होत असल्याने बदलीस स्थगिती
6) रवींद्र अण्णाजी मानकर, भंडारा येथून नागपूर ग्रामीण बदली
7) मनोहर हिरालाल कोरेटी, भंडारा येथून चंद्रपूर बदली
8) शिवाजी भिमराव कदम, भंडारा येथून चंद्रपूर बदली
9) उमेश नागोराव पाटील, चंद्रपूर येथून नागपूर ग्रामीण बदली
10) प्रदीप कुमार पंढरीनाथ शेवाळे, चंद्रपूर येथून नागपूर ग्रामीण बदली
11) स्वप्निल धोंडीराम धुळे, चंद्रपूर येथून भंडारा बदली
12) सत्यजित शशिकांत आमले चंद्रपूर येथून वर्धा बदली
