Top News

there is no Anganwadi in the village... the Anganwadi is held at the house of the Anganwadi worker......

अबब्......गावात अंगणवाडीच नाही...अंगणवाडी सेविकेच्या घरीच भरते अंगणवाडी......


७ वर्षा पासून अंगणवाडीच्या इमारतीची प्रतिक्षा......


दोनदा इमारत मंजुर होऊन सुद्धा बांधकाम झालेच नाही.......



विदर्भ माझा न्युज 24 - राजूरा


राजुरा तालुक्यातील हिरापूर ( चिंचोली ) येथे सात वर्षांपासून अंगणवाडी इमारत नाही .जुनी इमारत जीर्ण झाली होती त्यामुळे ती इमारत निर्लेखित करण्यात आली परंतु 7 वर्षाचा काळ निघून गेला पण तिथे नवीन इमारत झालीच नाही. दोन वेळा शासनाकडून इमारत मंजूर झाली पण निवळ 2 फुट जागा कमी पडत असल्याने इमारतीचे बांधकाम झाले नाही आणी शासनाने मंजुरी दिली नाही. हिरापूर हे गाव राजुरा तालुक्यातील शेवटचे गाव असून त्या गावाला ग्रामपंचायत दर्जा मिळाला नाही. कुठल्याच प्रकारच्या निधी वा योजना मिळत नसते. निवळ निवडणूक पुरते ग्रामपंचायत निमनि येते सामाविष्ट  केले. पण कुठल्याच निधीचा लाभ हिरापूरला   मिळत नसल्याची खंत गावकरी व्यक्त करीत आहे.


अंगणवाडी नसल्यामुळे अगणवाडी सेविका ही आपल्याच घरी मुलांना बसवतात त्यांना पोषण आहार देतात. महिलांना वेळोवेळी तपासणी साठी स्वतःच्या घरी बोलावतात. हिरापूर हे गाव पेसा मध्ये येतात पण पेसाचा कुठलाच निधी मिळत नसल्याने येथील गावकरी सुद्धा चिंतेत आहे.

अंगणवाडी केंद्र नसल्याने अनेक आरोग्याच्या समश्याना तोंड द्यावे लागते .मुलांना खेळण्यास जागा नसल्याने ते खेळू शकत नाही त्यांना एकाच जागेवर बसून राहावे लागते. गेल्या सात वर्षा पासुन तालुक्यातील हिरापूर गावकरी अंगणवाडीच्या प्रतिक्षेत आहे. संबंधीत विभागाने या कडे जातीने लक्ष देऊन गावाता  अंगणवाडी इमारत तथा मुलांना खेळण्या योग्य छोटे मैदान व खेळण्याचे साहीत्य उपलब्द करून देणे गरजेचे आहे.

तर लवकरात लवकर हिरापूर गावाला अंगणवाडी इमारत बांधून देण्यात यावी अशी विनंती आता हिरापूर येथील गावकरी करित आहे.

Previous Post Next Post