Placement Drive on May 22 in Chandrapur : युवक-युवतींसाठी रोजगाराची संधी; प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन
चंद्रपूर, दि. 19 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडल करिअर सेंटर, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 22 मे 2026 रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे. हा रोजगार मेळावा सकाळी 11 वाजता प्रशासकीय इमारत, चंद्रपूर येथे पार पडणार आहे.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. विशेषतः 10 वी, 12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी बँकिंग आणि इन्शुरन्स क्षेत्रातील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या प्लेसमेंट ड्राईव्हच्या माध्यमातून स्थानिक उद्योजक आणि नोकरी इच्छुक उमेदवार यांच्यात थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.
उमेदवारांनी काय आणावे?
- आधार कार्ड
- शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे
- रिझ्युमेच्या किमान दोन प्रती
अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर येथे 07172-252295 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
नोंदणीसाठी उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in वर ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन सहायक आयुक्त यांनी केले आहे.
