Free CDS Training Opportunity for Defence Aspirants : भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्ण संधी
चंद्रपूर, दि. 19 : भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी घेण्यात येणाऱ्या कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिस (CDS) परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड येथे मोफत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण 15 जून ते 28 ऑगस्ट 2026 या कालावधीत पार पडणार असून, निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची संपूर्ण मोफत व्यवस्था करण्यात आली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी 11 जून 2026 रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, चंद्रपूर येथे मुलाखतीस उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अशी आहे पात्रता
- उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा
- उमेदवाराने यूपीएससीमार्फत घेण्यात येणाऱ्या CDS परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज केलेला असावा
अर्जासाठी आवश्यक प्रक्रिया
उमेदवारांनी [महाराष्ट्र सैनिक कल्याण विभाग संकेतस्थळ https://www.mahasainik.maharashtra.gov.in येथे जाऊन “Other-PCTC Nashik CDS-66” कोर्ससाठी प्रवेशपत्र डाउनलोड करून त्याची पूर्ण माहिती भरलेली प्रत मुलाखतीवेळी सोबत आणणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिकईमेल : training.pctcnashik@gmail.com
दूरध्वनी : 0253-2451032
व्हॉट्सअॅप : 9156073306
कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष किंवा दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, चंद्रपूर यांनी केले आहे.
