Top News

नागभीडमध्ये दुर्मिळ पांढरा उंदीर आढळला ; नागरिकांमध्ये उत्सुकता

नागभीडमध्ये दुर्मिळ पांढरा उंदीर आढळला ; नागरिकांमध्ये उत्सुकता




नागभीड : शहरातील शिवनगर भागात एका दुर्मिळ पांढऱ्या उंदराचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रघुनाथ दुधपचारे यांच्या निवासस्थानी हा उंदीर आढळून आला असून परिसरातील अनेकांनी त्याला पाहण्यासाठी गर्दी केली.

पूर्ण पांढऱ्या रंगाचे शरीर आणि लालसर डोळे असलेला हा उंदीर “अल्बिनो” प्रजातीतील असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शरीरात मेलॅनिन रंगद्रव्याची कमतरता असल्यामुळे अशा प्राण्यांचा रंग पांढरा दिसतो, असे तज्ज्ञ सांगतात.


अशा प्रकारचे उंदीर नैसर्गिक वातावरणात फारच कमी प्रमाणात दिसून येतात. जंगल किंवा ग्रामीण भागात त्यांचा टिकाव लागणे अवघड मानले जाते. प्रकाशाची अधिक संवेदनशीलता आणि कमी दृष्टी ही त्यांची प्रमुख वैशिष्ट्ये असल्याचे सांगितले जाते.

वैज्ञानिक संशोधनातही पांढऱ्या उंदरांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. शिवनगर परिसरात हा दुर्मिळ जीव आढळल्याने नागरिकांमध्ये कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले असून दिवसभर या उंदराचीच चर्चा सुरू होती.

Previous Post Next Post