Top News

भद्रावतीत २९ मार्चला Vidarbha Level स्मृतिगंध काव्यसंमेलन; साहित्यप्रेमींसाठी पर्वणी

 भद्रावतीत २९ मार्चला Vidarbha Level स्मृतिगंध काव्यसंमेलन; साहित्यप्रेमींसाठी पर्वणी




भद्रावती / तालुका प्रतिनिधी - सुनील दैदावार : भद्रावती येथे रविवार, दि. २९ मार्च २०२६ रोजी विदर्भस्तरीय नववे ‘स्मृतिगंध’ काव्यसंमेलन आयोजित करण्यात आले असून साहित्यप्रेमी, कवी आणि रसिकांसाठी हा काव्यसोहळा आकर्षणाचा ठरणार आहे. स्व. विणा आडेकर स्मृती प्रतिष्ठान, भद्रावती यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

हे काव्यसंमेलन शहरातील  मुरलीधर पाटील गुंडावार सभागृहात पार पडणार असून सकाळी १०.३० वाजता उद्घाटन समारंभाने कार्यक्रमाची सुरुवात होईल. उद्घाटन समारंभ स्व. आचार्य ना. गो. थुटे स्मृतीमंचावर होणार आहे.

या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी व प्रख्यात रेखाचित्रकार प्रमोदकुमार अनेराव (भंडारा) राहणार आहेत. नगराध्यक्ष प्रफुल चटकी उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अजय देशपांडे, डॉ. किशोर कवठे, डॉ. प्रकाश महाकाळकर, प्रा. पुनीत मातकर, डॉ. प्रकाश वटी तसेच सामाजिक कार्यकर्ते विशाल गावंडे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विजय गायकवाड करणार आहेत.

दुपारी १२.३० वाजता ‘स्मृतिगंध निमंत्रितांचे कविसंमेलन’ पार पडणार असून या सत्रात डॉ. किशोर कवठे, प्रा. पुनीत मातकर, इरफान शेख, अविनाश पोईनकर व गजानन माद्यसवार यांची उपस्थिती राहणार आहे. या सत्राचे सूत्रसंचालन राजेश माहूरकर (नागपूर) करणार आहेत.

त्यानंतर दुपारी २.३० वाजता ‘स्मृतिगंध गझल मैफिल’ या विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्रात प्रवीण तुराणकर, जयवंत वानखेडे, राम रोगे, मंगेश जनबंधू व दिलीप पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. सूत्रसंचालन मारोती आरेवार करणार असून गौतम राऊत, प्रशांत भंडारे, केशव कुकडे, अर्जुमन शेख, अपर्णा नैताम, विजय वासाडे, रमेश बुरबुरे, सत्तू भांडेकर, अर्चना जुनघरे, मीनाक्षी गोरंटीवार, शितल कर्नेवार, नरेंद्र गंधारे व सुनील पोटे हे गझलकार सहभाग घेणार आहेत.

यानंतर ‘स्मृतिगंध कवितेच्या गावात’ या सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्राच्या अध्यक्षस्थानी भारती लखमापूरे राहणार असून दीपक शिव, सुभाष उसेवार, मंजुषा दरवरे, संगीता पिज्दुरकर, जयंत लेंझे व डॉ. ज्ञानेश हटवार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. सूत्रसंचालन गणेश पेंदोर करणार आहेत.

नवोदित कवींच्या काव्यप्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि साहित्याची परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हा ‘स्मृतिगंध’ काव्यसंमेलनाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. या काव्यसंमेलनाला साहित्यप्रेमी, कवी आणि रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे प्रवीण आडेकर यांनी केले आहे.

Previous Post Next Post