Top News

Nagbhid Police Raid : नागभीड पोलिसांची मोहाडी शेतशिवारात जुगार अड्ड्यावर धाड; ६,५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त

Nagbhid Police Raid : नागभीड पोलिसांची मोहाडी शेतशिवारात जुगार अड्ड्यावर धाड; ६,५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त




 नागभीड – नागभीड तालुक्यातील मोहाडी शेतशिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर नागभीड पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून पाच जण घटनास्थळावरून फरार झाले. पोलिसांनी जुगाराच्या डावावरून रोख रक्कमसह ६ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

८ मार्च २०२६ रोजी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की मोहाडी शेतशिवारात काही इसम पैशांची बाजी लावून जुगार खेळत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने दोन पंचांसमक्ष मोहाडी शेतशिवारात धाड टाकली. धाडीत आरोपी राहुल आनंदराव दडमल (रा. कुणघाडा चक, ता. नागभीड), शत्रुधन रमेश चौधरी (रा. कुणधाडा, ता. नागभीड), सुरेश निलकंठ शेंडे (रा. बाम्हणी, ता. नागभीड) आणि दिनेश गुलाब चन्नोडे (रा. मोहाडी मोकासा, ता. नागभीड) हे जुगार खेळताना आढळून आले.




दरम्यान अभिषेक अशोक अलोने (रा. कुणघाडा चक), विजय बागडे (रा. बाम्हणी), साहील पटवारी ठाकरे (रा. मोहाडी मोकासा), मंगेश मनोहर कोडापे (रा. कुणधाडा चक) आणि करण प्रभुजी टांडके (रा. मोहाडी मोकासा) हे आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.

पोलिसांनी आरोपींची अंगझडती घेतली असता तसेच जुगाराच्या डावावरून एकूण ६,५८० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी आरोपींना ताब्यात घेऊन नागभीड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२७/२०२६ अंतर्गत महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही मुम्मका सुदर्शन पोलीस अधीक्षक, ईश्वर कातकडे अप्पर पोलीस अधीक्षक, दारासिंग राजपूत उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली रमाकांत कोकाटे पोलीस निरीक्षक, नागभीड यांच्या नेतृत्वात पोउपनि अजिंक्य गोविंदलवार, पो.अ. दिलीप चौधरी, पो.अ. विकम आत्राम, पो.अ. निलेश गायकवाड आणि पो.अ. प्रफुल रोहनकर यांच्या पथकाने

Previous Post Next Post