Top News

राहुल गांधी यांच्या आंदोलनाविरोधात पिंपळखुंट येथे भाजपाचे निषेध आंदोलन

राहुल गांधी यांच्या आंदोलनाविरोधात पिंपळखुंट येथे भाजपाचे निषेध आंदोलन


 मूल : संसदेत १२ मार्च २०२६ रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत असताना काँग्रेस नेते Rahul Gandhi व काँग्रेस खासदारांनी संसद भवनाच्या मकर द्वारावर केलेल्या आंदोलनाचा भाजपा चंद्रपूर जिल्हा ग्रामीणच्या वतीने निषेध करण्यात आला. या पार्श्वभूमीवर मूल तालुक्यातील पिंपळखुंट येथे निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले.

रविवार, १५ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता पार पडलेल्या या आंदोलनात भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. संसदेसारख्या लोकशाहीच्या सर्वोच्च संस्थेच्या परिसरात अशा प्रकारचे आंदोलन करणे हे अयोग्य व खेदजनक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

या आंदोलनात भाजपा चंद्रपूर जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष हरीश ज. शर्मा, बल्लारपूर विधानसभा संघटन मंत्री राम लाखिया, भाजपा माजी जिल्हा महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, मूल शहर मंडळ अध्यक्ष प्रवीण मोहुर्ले यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी भाजपा पदाधिकारी तनय देशकर, मोती टहलानीया, अजय गोगुलवार, राकेश ठाकरे, रत्नमाला भोयर, किरण कापगते तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post Next Post