अमली पदार्थ रोखा – चंद्रपूर वाचवा!
भाजप शिष्टमंडळाकडून जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन; कठोर कारवाईची मागणी
चंद्रपूर : शहरात अमली पदार्थांच्या विक्री आणि सेवनाचा वाढता धोका चिंताजनक पातळीवर पोहोचला असून नुकत्याच मुंबईहून आलेल्या व्यक्तीकडून तब्बल ५२८ ग्रॅम एम.डी. (मेफेड्रोन) हा अमली पदार्थ जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
या पार्श्वभूमीवर युवकांच्या आयुष्याशी आणि त्यांच्या भविष्यासोबत खेळणाऱ्या या अमली पदार्थांच्या साखळीवर कठोर अंकुश आणण्यासाठी भारतीय जनता पक्ष, जिल्हा चंद्रपूरतर्फे माजीं पालकमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार जिल्हा पोलिस अधीक्षक मा. श्री. एम. सुदर्शन यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात अमली पदार्थांच्या विक्री, वाहतूक व वितरणावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून खालील महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या –
🔸 संशयित ठिकाणी पोलिसांचे विशेष छापे आणि सतत गस्त
🔸 शाळा, महाविद्यालयांमध्ये जनजागृती मोहीम
🔸 पोलिस, अन्न व औषध प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त टास्क फोर्सची स्थापना
🔸 गुन्हेगारांवर कठोर शिक्षा आणि द्रुतगती न्यायप्रक्रिया
🔸 युवकांना क्रीडा आणि संस्कारवर्धन उपक्रमांकडे वळविण्याची मोहीम
या निवेदनादरम्यान डॉ. मंगेश गुलवाडे (महामंत्री, भाजप – जिल्हा चंद्रपूर), विशाल निंबाळकर, मनोज सिंघवी, यश बांगडे, गणेश रामगुंडेवार, उमेश आष्टणकर, अमित निरंजने आणि मनिष खापरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
भाजप शिष्टमंडळाने पोलिस प्रशासनाला आवाहन केले की,
“अमली पदार्थ रोखा – चंद्रपूर वाचवा!” हे फक्त घोषवाक्य नसून ही समाजातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. युवकांचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी तात्काळ आणि प्रभावी पावले उचलावीत,”
असे आवाहन डॉ. मंगेश गुलवाडे यांनी केले.
