Top News

कटाळ्या मारुती देवस्थान डोंगरगाव ता. नागभीड येथे श्री राम भक्तां द्वारे हनुमान चालीसा पठण संपन्न......

कटाळ्या मारुती देवस्थान डोंगरगाव ता. नागभीड येथे श्री राम भक्तां द्वारे हनुमान चालीसा पठण संपन्न......




विदर्भ माझा न्युज 24 - ता.प्र. नागभीड 

आज दिनांक २०/१/२०२४ रोजी तालुक्यातील कटाळ्या मारुती देवस्थान डोंगरगाव येथे श्री राम भक्तांन कळून हनुमान चालीसा पठन घेण्यात आले. राम भक्तांनि सर्व प्रथम श्री हनुमान मूर्तीचे जलाभिषेक करून मूर्तीला शेंदूर लावले विधिवत पूजा करून गुरु मंत्र, हनुमान मंत्र म्हणून प्रभू श्री राम यांच्या नावाचा जयघोष करीत हनुमान चालीसा पठन ला सुरवात केली. 


 हनुमान चालीसा पठन करून विधिवत आरती नंतर प्रसाद वितरण करण्यात आले.  या वेळेस संपूर्ण परिसर भक्ती मय झाला होता. सदर कार्यक्रम आमदार बंटी भांगडिया यांचा सुचणे नुसार चिमूर  विधानसभा प्रमुख  गणेश तर्वेकर यांच्या प्रमुख उपस्थीतीत पार पडला. 


 या वेळी  न. प. नागभीड चे माजी सभापती  सचीन आकुलवार,विश्व हिंदु परीषद चे  माजी जिल्हा अध्यक्ष अजय काबरा, माजी नगरसेवक रूपेश गायकवाड,पराग गुंडेवार, दिनेश समर्थ, शुभम चील्लुरे, रमाकांत ठाकरे, गोपाळजी नाखाडे, विजय दैवलकर, चंद्रकांत अम्रुतकर,  सम्मय  जक्कनवार, सारंग चिल्लुरे , अशोकजी पीसे, दिलीप जी सोनटक्के, राजु पीसे, संजभाऊ मालोदे सह तालुक्यातील असंख्य राम भक्त उपस्थित होते.

  दरम्यान चिमूर येथील युवा नेते समीर  राचलवार,संजय गांधी निराधार समिती चिमूर चे अध्यक्ष  संजय  नवगडे, संदीप पिसे, मंगेश धाडसे, रोशन बन्सोड, बंटी वनकर, अमित जुमडे, श्रेयस लाखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
Previous Post Next Post