Top News

आयता येथील जी.प.शाळा भरली गटविकास अधिकाऱ्याच्या कक्षात

आयता येथील जी.प.शाळा भरली गटविकास अधिकाऱ्याच्या कक्षात



विदर्भ माझा न्युज 24 - आर्णी ता.प्र. : हिरासींग राठोड

आर्णी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या आयता येथील जी.प . शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन शाळा  व्यवस्थापन समिती व पालक वर्ग यांनी अनेक वेळा निवेदन देऊन सुद्धा शिक्षक नसल्याने शाळा बंद आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे त्याकरिता गावातील जि प शाळेतील  विद्यार्थ्याच्या पालकांनी आपले मुले घेऊन आर्णी येथील गटविकास गट विकास अधिकारी यांच्या कक्षात विद्यार्थ्यांनी शाळा भरवली जोपर्यंत शिक्षक देत नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही अशी पवित्रा घेतल्याने अखेर शासन नरमल त्वरित शिक्षकाची नियुक्ती ऑर्डर हातात घेऊन पालकाचा मोर्चा घराकडे वळला आयता येथे १ते ७ वर्ग आहे या शाळेत एकच शिक्षक होते शाळा  सुरू होती पण शिक्षक आजारी पडल्याने शाळा सुद्धा आजारी पडली त्या शाळेवर शिक्षक नसल्याने शाळा बंद राहायची अनेक वेळा निवेदने दिली कुंभकर्ण  झोपेतअसलेल्या शासन त्यांना गरीबाची काय घेणे देणे हे गाव पेसा  अंतर्गत येत असल्याने शासनाच्या अनेक सुख सुविधा मुबलक असतात पण शिक्षणाचा पाया हाच मजबुत नसला तर इतर योजनेचा काय फायदा पहिलेच ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा अत्यंत खालावलेला आहे सर्व शिक्षक मुख्यालयी राहत नसल्याने शिक्षणात ग्रामीण भागातील शिक्षणाचा खेळ खंडोबा झालाय काही शिक्षक जिल्ह्याच्या ठिकाणावरुन तर काही शिक्षक तालुक्याच्या ठिकाणाहून ये जा करत असतात त्यांना शाळेच्या वेळेच्या  घंट्यांची व विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची काय घेणे देने आपल्या मुलाच्या सुख सुविधा करिता आपला मुलगा चांगल्या दर्जेदार शाळेमध्ये शिक्षण घ्यावा व मोठा व्हावा आपण ज्या शाळेवर जातो तो  विद्यार्थी शिकलाय काय नाही काय यांचे शिक्षकांना काही घेणे देणे राहीले नसावे असे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे तरी शिक्षण विभागाने ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा सुधारविण्याकरिता लक्ष देण्याची गरज आहे काही का असेना आयता येथील जी .प.शाळेला शिक्षक मिळाल्याने पालकांची व शाळा व्यवस्थापन समिती जद्द पुर्ण झाली.

Previous Post Next Post