होली फेथ इंग्लिश प्राइमरी स्कूल येथे क्रीडा क्रीडा सप्ताहाला सुरुवात....
विदर्भ माझा न्युज 24 - तेल्हारा : मनोज भगत : विषेश प्रतिनीधी
होली फेथ इंग्लिश प्राइमरी स्कूल हिवरखेड येथे 18 जानेवारी ते 24 जानेवारी दरम्यान स्वर्गवासी आबासाहेब खेडकर शिक्षण संस्थेद्वारा संचालित होली फेथ इंग्लिश प्रायमरी स्कूलचे अध्यक्ष माननीय जीवनराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. क्रीडा सप्ताहाच्या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी केंद्रप्रमुख मनीष गिऱ्हे होते.
तर कार्यक्रमाचे उद्घाटन फीत कापून हिवरखेड नगरीच्या प्रथम नागरिक सरपंच सौ वैशाली वानखडे यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रमुख अतिथी म्हणून सतीश इंगळे जगन्नाथ महाकाळ देवेंद्र राऊत प्राध्यापक सागर ढाकरे प्राध्यापक निखिल भड यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून माता सरस्वतीचे व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. कल्पना अस्वार यांनी केले तर संचालन शितल रेखाते यांनी केले तसेच उद्घाटक म्हणून लाभलेले सरपंच सौ वैशाली वानखडे यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व सांगून मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या तसेच भड सर ठाकरे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मनिष गिऱ्हे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना मैदानी खेळाचे महत्व पटवून दिले व कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या त्यानंतर क्रीडा स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. संपूर्ण दिवसात एक ते चार वर्गाच्या धावण्याची शर्यत व तीन पायाची शर्यत असे दोन खेळ घेण्यात आले. स्पर्धेचे निरीक्षक सौ.सोनू कुऱ्हाडे व सौ शितल शेळके होत्या तर आभार शितल वानखडे यांनी केले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रिया वालचाळे, ममता इंगळे , पल्लवी फोपसे , शीतल अग्रवाल , सीमा सोनवणे , कुमुदिनी डेंगेकर, प्रतिभा वाईकर, राजाराम इंगळे, मनीष ताळे, आदींनी परिश्रम घेतले.
