आमदार बंटी भांगडीया यांचा चिमूर तालुक्यातील श्री साई विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय भिसी आणि शावलिन पब्लीक अकॅडमी भिसी च्या वतीने सत्कार.....
विदर्भ माझा न्युज 24 - ता.प्र. - चिमूर
आमदार बंटी भांगडीया यांना चिमूर तालुक्यातील श्री साई विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय भिसी आणि शावलिन पब्लीक अकॅडमी भिसी येथे संस्थेच्या वतीने नुकत्याच संपन्न झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्याला कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून निमंत्रित करण्यात आले होते.
मात्र या कार्यक्रमाच्या दिवशी आमदार बंटी भांगडीया हे इच्छा असतानाही व्यस्ततेमुळे त्यांना कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविता आली नाही. सदर संस्थेच्या सदस्यांनी दि.18 जानेवारी ला आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांची थेट चिमूर येथील निवासस्थानी भेट घेतली.
याप्रसंगी संस्थेच्या वतीने आमदार बंटी भांगडीया यांना सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सदस्य मनोज गोलजवार, सौरभ दंदे, पंकज मिश्रा, गणेश गभणे, नितीन कायरकर, गोपाल सेलवटकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.
