प्रभु श्रीराम प्राण प्रतिष्ठा महोत्सव समिती नागभीड तर्फे श्रीराम जागरण व कार सेवकांचा सत्कार सन्मान संपन्न.......
आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती.....
विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड (ता.प्र.)
शहरात दि. 22 जानेवारी ला सकाळ पासुनच प्रभु श्रीराम प्राण प्रतिष्ठा महोत्सव समिती नागभीड येथे विविद्ध कार्यक्रम आयोजित केल्या गेले होते. साकाळी भव्य बाईक रॅली तर सर्व देवस्थानात भजन कीर्तन, श्रीराम मंदिर देवस्थानात महाआरती आणी महाप्रसाद चे कार्यक्रम पार पडले सायंकाळी ६:०० वाजता श्रीराम मंदिर परीसरात भव्य श्रीराम जागरण आणी कार सेवकांचा सत्कार करण्यात आला.
दरम्यान आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांनी नागभीड येथे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आयोजित ‛भव्य श्रीराम जागरण’ कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली. याप्रसंगी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम मंदिरात पूजाअर्चना करून मनोभावे दर्शन घेतले आणि उपस्थित श्रीरामभक्तांशी संवाद साधून मंगलमय शुभेच्छा दिल्या.
प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा महोत्सव समितीच्या वतीने आमदार बंटी भांगडीया यांच्या हस्ते अयोध्येत कारसेवा केलेल्या नागभीड शहरातील कारसेवकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सर्व कारसेवकांना श्रीराम मंदिराची प्रतिकृती व शाल-श्रीफळ भेट देऊन गौरविण्यात आले. तसेच, समस्त श्रीरामभक्तांच्या वतीने आमदार बंटी भांगडीया यांचे श्रीराम मंदिराची प्रतिकृती व शाल-श्रीफळ भेट देऊन प्रा.हरीभाऊ गरफडे यांच्या हस्ते स्वागत सत्कार करण्यात आले.
यावेळी नागभीड राम मंदिर चे संस्थापक प्रा. डाॅ. राजन जैयस्वाल यांचा आमदार बंटी भांगडीया यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंत वारजूकर, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजू देवतळे, भाजयुमो प्रदेश सचिव मनिष तुंम्पल्लीवार, भाजपा चिमूर विधानसभा निवडणूक प्रमुख गणेश तर्वेकर, माजी प्रथम नगराध्यक्ष न.प. नागभीड प्रा. उमाजी हिरे, भाजपा ज्येष्ठ नेते घनश्याम डुकरे, माजी बांधकाम सभापती न.प. नागभीड सचिन आकुलवार, प्रा. डाॅ.जैस्वाल , ऍड. रविंद्र चौधरी , विश्व हिंदू परीषद चे माजी जिल्हा अध्यक्ष अजय काबरा, सतिश जाधव,नागभीड व्यापारी संघाचे माजी सचीव विजय काबरा,भाजप जेष्ठ नेते प्रा. हरीभाऊ गरफडे , बंडु गेडाम,पराग गुंडेवार,दिनेश समर्थ,पंकज गरफडे,शुभम चिल्लुरे,रमाकांत ठाकरे,संजु मालोदे,माजी नगरसेवक रुपेश गायकवाड , संजय अम्रुतकर,सचीन चिलबुले, प्रा.गणपत देशमुख,प्रा.देवीदास चिलबुले,ऍड.रविंद्र चौधरी,प्रफुल लांबट, रामदास बहेकर,हेमंत नन्नावरे,राजु पीसे,मंगेश कूरजेकार,अशोक पीसे,विनीत चिल्लमवार,स्नेहा कुरजेकार,संचीता येरने,जयश्री गरफडे,प्रीया लांबट,उरमीला गीरीपुंजे,साक्षी पीसे, सह असंख्य भाजपा पदाधीकारी कार्यकर्ते, महिला आघाडी पदाधीकारी कार्यकर्ते तसेच,विश्व हिंदु परीषद,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंगदल सह शहरातील श्रीराम भक्त मोठ्या संखेत उपस्थीत होते.
समीतीच्या वतीने या आधी आठवडाभर अक्षदा वितरन,कटाळ्या देवस्थान डोंगरगाव येथे हनुमान चालीसा पठन,नागभीड नगरीतील सर्व मंदिरा मध्ये जलाभीषेक, कलश यात्रा इ. कार्यक्रमाची रेलचेल सुरु होती.





