नागभीड नगरी प्रभु श्रीराम नामाच्या जय घोषाने दुमदुमली....
भव्य भगवा महारॅली ने शहरात भगवामय वातावरण.....
विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड (ता.प्र)
शहरात आमदार बंटी भांगडीया यांच्या मार्गदर्शनात, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंतभाऊ वारजुकर, जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे,चिमुर विधानसभा प्रमुख गणेश तर्वेकर,विश्व हिंदु परीषद चे माजी जिल्हा अध्यक्ष अजय काबरा, माजी सभापती सचीन आकुलवार, प्राचार्य हरी गरफडे यांच्या प्रमुख उपस्थीतीत प्रभु श्रीराम प्राण प्रतिष्ठा महोस्तव समिती नागभीड व्दारे भव्य भगवा ध्वज बाईक रॅली काढण्यात आली.
शहरातील रेल्वे ग्राउंड वरून रॅली ला सुरवात झाली तर सदर रॅली ही शहरातील प्रतेक देवस्थानाला भेट देत राम मंदीर परीसरात पोहचली व प्रभु श्रीराम यांच्या अयोद्या येथील प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपन स्क्रीन वर दाखवीन्यात आले.
प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम होताच श्रीराम मंदिर नागभीड येथे महाआरती करण्यात आली.
आरती नंतर मंदिर ट्रस्ट तर्फे विधानसभा प्रमुख गणेश तर्वेकर
व विश्व हिंदू परीषद चे माजी जिल्हा अध्यक्ष अजय काबरा
यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. व नंतर लगेच महाप्रसाद वितरन कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.
सदर कार्यक्रमात भाजप चे नेते बंडु गेडाम,पराग गुंडेवार,दिनेश समर्थ,शुभम चिल्लुरे,रमाकांत ठाकरे,संजु मालोदे,माजी नगरसेवक रुपेश गायकवाड,पंकज गरफडे , संजय अम्रुतकर,सचीन चिलबुले, प्रा.गणपत देशमुख,प्रा.देवीदास चिलबुले,ऍड.रविंद्र चौधरी,प्रफुल लांबट, रामदास बहेकर,हेमंत नन्नावरे,राजु पीसे,मंगेश कूरजेकार,अशोक पीसे,विनीत चिल्लमवार,स्नेहा कुरजेकार,संचीता येरने,जयश्री गरफडे,प्रीया लांबट,उरमीला गीरीपुंजे,साक्षी पीसे, सह असंख्य भाजपा पदाधीकारी कार्यकर्ते, महिला आघाडी पदाधीकारी कार्यकर्ते तसेच,विश्व हिंदु परीषद,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंगदल सह शहरातील श्रीराम भक्त मोठ्या संखेत उपस्थीत होते.









