Top News

वंचित बहुजन युवा आघाडीच्या गडचांदूर शहर अध्यक्षपदी गौतम लोणारे.... Gatchandur City President of Vanchit Bahujan Yuva Aghadi Gautam Lowane....

वंचित बहुजन युवा आघाडीच्या गडचांदूर शहर अध्यक्षपदी गौतम लोणारे....



विदर्भ माझा न्युज 24 - चंद्रपूर/ गडचांदूर 



वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर व डॉ. निलेश विश्वकर्मा अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश युवा आघाडी यांच्या आदेशाप्रमाणे गडचांदूर कार्यकारिणीसाठी वंचित बहुजन युवा आघाडीच्या कार्यकारणी आदेशाद्वारे घोषणा करण्यात आली असून शहर युवा आघाडीच्या अध्यक्षपदी गौतम लोणारे यांची तर महासचिव प्रतिज्ञा धोंगडे तसेच उपाध्यक्ष नितेश खैरे, अजय मेश्राम, तमजीत शेख , नम्रता खासे, सोनू गुरुमुले आणि संघटक म्हणून महेश ससाने व सचिव किशोर पोघे यांची नियुक्ती करण्यात आली तसेच सदस्य सचिन मेश्राम, सिद्धांत खैरे, सिद्धार्थ पतंगे ,सावर पठाडे, अमोल वाघमारे, ईश्वर इटकेलवार, प्रशांत रामटेके ,सचिन सोनटक्के ,स्नेहल ढाले, रोशन चारबे, आकाश धोंगडे, कृष्णा खासे ,महादेव गेडाम ,संजय मेश्राम, सुरज सूर्यवंशी, सुनील खोब्रागडे, चंद्रशेखर बांबोडे ,प्रशांत डोंगरे, यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.

वंचित बहुजन युवा आघाडीच्या संघटनात्मक बांधणी तसेच पक्ष वाढीच्या उद्देशाने जबाबदारी देण्यात आली आहे पदाच्या उपयोग करून पक्षाला नव्या उंचीवर नेण्यासाठी कटिबद्ध राहणार असे वंचित बहुजन युवा आघाडीचे शहराध्यक्ष गौतम लोणारे तसेच महासचिव प्रतिज्ञा धोंगडे आणि उपाध्यक्ष नितेश खैरे ,अजय मेश्राम, तमजीत शेख, नम्रता खास ,सोनू गुरुमुले, यांनी म्हटले आहे.

Previous Post Next Post