मनसे जिल्हाध्यक्ष मंदीप रोडे ह्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने राजुरा येथे मनसे कडून मिठाईचे वाटप.....
विदर्भ माझा न्युज 24 - चंद्रपूर/ राजुरा
मनसेचे जिल्हाप्रमुख मंदिप रोडे ह्यांचा वाढदिवस मनसे कार्यकर्त्यांनी अत्यंत उत्साहात व सामाजिक जाणिवेची जाण ठेऊन साजरा केला, मनसेचे तालुका अध्यक्ष आदित्य भाके ह्यांच्या नेतृत्वात राजुरा शहरात विविध ठिकाणी वाढदिवस व दिपावली चे औचित्य लक्षात घेऊन मिठाईचे वाटप करण्यात आले, राजुरा उपजिल्हा रुग्णालयासह अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी मिठाईचे वाटप करून नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत मंदिप रोडे ह्यांच्यासाठी शुभ आशिर्वाद घेतले, ह्या प्रसंगी मनसे तालुका अध्यक्ष आदित्य भाके,तालुका उपाध्यक्ष रोहित बताशांकर, मारोती मेश्राम, शहर सचिव साहिल चौधरी,प्रमोद लोहे,सौरभ चोपडे,आशिष वडस्कर, जगदीश चोपडे,विजय तलांडे आदी सह मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,

