आदिवासी गोंड गोवारी संघटने तर्फे आमदार रोहित पवार यांचा ताफा अडवीला.....
विदर्भ माझा न्युज 24 - यवतमाळ
आदिवासी गोंड गोवारी संघटने तर्फे आमदार रोहित पवार यांचा ताफा अडवून त्यांना निवेदन देण्यात आहे. दिनांक 18 डिसेंबर 2020 सुप्रिम कोर्ट आॕर्डर क्रमांक 4096 नुसार गोवारी जमात आदिवासी नसुन गोंड गोवारी जमात आदिवासी आहे व ही गोंड गोवारी यवतमाळ जिल्ह्यातील 1961 साली असलेल्या पाच तालुक्यापैकी यवतमाळ,वणी व केळापुर तालुक्यात गोंड गोवारी जमातीचे अस्तित्व दाखवले आहे.म्हणजे आज अस्तित्वात असलेल्या एकुण 13 तालुक्यात गोंड गोवारी जमात आहे.1961 च्या जनगणनेवर आधारित इथनोग्राफीक नोट्स मध्ये नागोसे ,नेहारे,राऊत अशा प्रकारची आडनावे त्यात नमुद आहे.
असे असताना व या निकालाला आज तीन वर्षे पुर्ण होत आहे परंतु राज्य शासनाने आमच्या गोंड गोवारी जमाती ला जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी शासन आदेश काढले नाही.आम्हाला सुप्रिम कोर्ट आदेशानंतर ही आदिवासी च्या संवैधानिक हक्कापासुन वंचित ठेवले जात आहे.तरी कृपया नागपूर येथे होणाऱ्या विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आमच्या अन्याया विरुध्द व आमचे आदिवासींचे हक्क मिळण्यासाठी आवाज उचलावा अशी मागणी आदिवासी गोंड गोवारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राजेश नागोसे, मोहन ठाकरे यांनी निवेदना मार्फत आमदार रोहित पवार यांना करण्यात आली. या वेळी संघटनेचे अशोक बोटरे,संतोष बोटरे, निलेश गजबे उपस्थीत होते.
