Top News

विश्राम गृह गडचांदुर येथे भाजपा फिरते रुग्णालय संबंधित तालुका बैठक संपन्न.... Taluka meeting concluded regarding BJP mobile hospital at Vishram Griha Gadchandur....

विश्राम गृह गडचांदुर येथे भाजपा फिरते रुग्णालय संबंधित तालुका बैठक संपन्न....




विदर्भ माझा न्युज 24 - चंद्रपूर/  गडचांदुर 



फिरते रुग्णालय संबंधित बैठक मा ना  हंसराजजी अहिर यांच्या संकल्पनेतून फिरते रुग्णालय ओकाळ व हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेसाठी लोकार्पण सोहळा घेण्यात येत आहे या नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीच्या अध्यक्षस्थानी  खुशालभाऊ बोंडे लोक सभा विस्तारक तथा भाजपा नेते चंद्रपूर होते तर प्रमुख पाहुणे  नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना जिल्हा उपाध्यक्ष तथा संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष,सतिशभाऊ उपलंचिवार शहर अध्यक्ष गडचांदुर, शिवाजी भाऊ सेलोकर भाजपा नेते,मनोहर कुळसंगे तालुका महासचिव, नुतनकुमार जिवणे माझी पंचायत समिती सदस्य,  निलेशभाऊ ताजने माझी नगरसेवक, रामसेवक मोरे नगरसेवक, अरुण भाऊ डोहे नगरसेवक, माहादेवराव एकरे, कवडु पा जरिले, रोहण काकडे युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते  खुशाल भाऊ बोंडे यांनी कार्यक्रमा बद्दल सविस्तर माहिती दिली व 19:11:2023 रोजी ठीक 3:00 वाजता बस्टाप गडचांदुर येथे मा ना  हंसराजजी अहिर राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री भारत सरकार यांच्या संकल्पनेतून फिरते रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात येईल तरी तालुक्यातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नागरिक महिला पुरुषांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे या कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य  तिरुपती कन्नाके,रामकृष्ण तुरणकर, वाघमारे,केवट,शेंडे आदी भाजपा तालुका कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतिश भाऊ उपलंचिवार यांनी केले तर आभार रोहण काकडे यांनी मानले बैठकीला भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Previous Post Next Post