Top News

स्टूडेंट फोरम ग्रुप च्या शिष्यवृत्ती स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद... Spontaneous response of students to the scholarship competition of Student Forum Group...

स्टूडेंट फोरम ग्रुप च्या शिष्यवृत्ती स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...



विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना 


स्टूडेंट फोरम ग्रुप कोरपना द्वारा आयोजित शैक्षणिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 2023 मध्ये दिनांक 29 ऑक्टोबर 2023 ला महात्मा फुले शिष्यवृत्ती स्पर्धेला शेकडो विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

शैक्षणिक क्षेत्रात गेली 9 वर्षे विविध उपक्रम राबवत नाव लौकिकास आलेल्या कोरपना तालुक्यातिल स्टूडेंट फोरम ग्रुप द्वारा आयोजित शैक्षणिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 2023 मध्ये दिनांक 29 ऑक्टोबर 2023 ला महात्मा फुले शिष्यवृत्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली. ही स्पर्धा कोरपना तालुका मर्यादित असून त्याचे यावर्षी तालुक्यातील 4 परीक्षा केंद्रावर आयोजन करण्यात आले. या परिक्षेला तालुक्यातील विद्यार्थ्यांकडून अभूतपूर्व प्रतिसाद देण्यात आला. 

महात्मा फुले शिष्यवृत्ती स्पर्धेच्या माध्यमातून दुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये  स्पर्धा परिक्षाची जागरूकता आणी स्पर्धा परिक्षेचे वातावरण निर्माण करून आपल्या तालुक्यातील मुलांना आपले भविष्य उज्वल करण्यास मार्गदर्शन करण्याचे कार्य स्टूडेंट फोरम ग्रुप च्या माध्यमातून गेली 9 वर्षे करण्यात येत आहे.

या शिष्यवृत्ती स्पर्धेचा यशस्विता म्हणजे या स्पर्धेचे लाभार्थी आजपावेतो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध पदावर  कार्यरत आहे तसेच सैन्यदल पोलिस प्रशासन आणि इतर ही विभागात उच्च पदावर कार्यरत आहे. या ग्रुप चे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांकरिता विद्यार्थ्यांकरवी चालवलेली संघटन होय.ज्यामध्ये आज घडीला शेकडो संघटकानी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या आपला सहभाग घेऊन कार्य करत आहे.

यावर्षी च्या महात्मा फुले शिष्यवृत्ती स्पर्धेला 1016 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून शिष्यवृत्ती परीक्षा दिली. या करिता ग्रुपच्या सर्व संघटकानी परिश्रम व योग्य नियोजन करून शिष्यवृत्ती स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली.

Previous Post Next Post