Top News

विरोधी पक्षनेते ना.विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते मौजा.पारडी येथील कॅन्सरग्रस्त रुग्णास आर्थिक मदत... Financial assistance to a cancer patient in Mauja Pardi by the Leader of the Opposition Mr. Vijaybhau Vadettiwar...

विरोधी पक्षनेते ना.विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते मौजा.पारडी येथील कॅन्सरग्रस्त रुग्णास आर्थिक मदत...



 विदर्भ माझा न्युज 24 - सावली


विरोधी पक्षनेते,माजी मंत्री तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या तर्फे मौजा.पारडी येथील कॅन्सरग्रस्त रुग्ण ढीवरू रामाजी गेडाम वय ५९ वर्ष यांना पारडीचे सरपंच बंडू मेश्राम यांच्या हस्ते आर्थिक मदत देण्यात आली.

पारडी येथील ढीवरू रामाजी गेडाम वय ५९ वर्ष हे मागील काही दिवसापासून आजारी असल्यामुळे उपचार घेत होते,  वृद्धपकाळाने त्यांना उठणे बसने शक्य नव्हते,ह्या करिता ते पुढील उपचार करीत असताना उपचारा दरम्यान डॉक्टरांनी त्यांना कॅन्सर असल्याचे स्पष्ट केले, घरातील आर्थिक स्थिती बिकट असल्याने पुढील उपचाराकरिता त्यांना आर्थिक मदत हवी असल्याची माहिती उसेगावचे उपसरपंच सुनील पाल यांनी सावली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नितीन गोहणे यांना माहिती दिली. नितीन गोहने यांनी तात्काळ राज्याचे विरोधी पक्षनेते ना.विजय वडेट्टीवार यांना संपर्क करून तात्काळ ढीवरुजि गेडाम यांना आर्थिक मदत मिळवून दिली.

आर्थिक मदत देताना पारडी ग्रामपंचायतीचे सरपंच बंडू मेश्राम,उसेगाव ग्राम काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा उपसरपंच सुनील पाल,ग्रामपंचायत सदस्या सौ.ज्योती पाल,गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष वेणूदास भोयर,केशव बट्टे, रामचंद्र पोटे, राजू बट्टे,चरणदास बट्टे आदी उपस्थित होते.

Previous Post Next Post