Top News

स्थानिक भूमिपुत्र बेरोजगारांसाठी म.न.से तालुका अध्यक्ष आदित्य भाके आक्रमक..... MNS taluka president Aditya Bhake aggressive for local Bhoomiputra unemployed..... At Harsha Company Power Limited, a strike led by District President Mandeep Rode.....

स्थानिक भूमिपुत्र बेरोजगारांसाठी म.न.से तालुका अध्यक्ष आदित्य भाके आक्रमक.....


हर्षा कंपनी पॉवर लिमिटेड येथे जिल्हाध्यक्ष मंदीप रोडे यांच्या नेतृत्वात धडक.....



विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा


महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच स्थानिक बेरोजगारांचा प्रश्न घेऊन आंदोलन करण्यात अग्रेसर राहीली आहे.त्याचप्रकारे 6 महिन्या पूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून हर्षा कंपनी पॉवर लिमिटेड साखरी येथे स्थानिक बेरोजगारांना रोजगार देण्यात यावा याकरिता निवेदन देण्यात आले होते.

       आज 6 महिन्याचा मनसे चा अल्टिमेट संपल्यावर जिल्हाध्यक्ष श्री. मंदीप रोडे यांच्या नेतृत्वात राजुरा तालुका अध्यक्ष आदित्य भाके यांनी बेरोजगारांना घेऊन हर्षा कंपनी येथे धडक दिली आणि स्थानिक बेरोजगारांना त्वरित रोजगार देण्यात यावा याकरिता आक्रमकपणे चर्चा करण्यात आली अन्यथा कंपनी काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष मंदीप रोडे यांनी दिला त्यावेळी तालुका अध्यक्ष आदित्य भाके,तालुका उपाध्यक्ष मारोती मेश्राम,रोहित बत्ताशंकर,शहर अध्यक्ष कित्तू मेडपल्लिवार, आदी मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post Next Post