Top News

बल्लारशाह तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापित. - संजय राईंचवार (तहसीलदार)

 बल्लारशाह तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापित. - संजय राईंचवार (तहसीलदार)


तालुक्यातील जनतेला विविध माहिती साठी, मदती साढी संपुर्ण माहिती मिळेल आता एकाच ठिकानी .





( विदर्भ माझा न्युज 24 ) बल्लारशाह :- चांदा जिल्हाचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या निर्देशांन्वे तहसिल कार्यालय बल्लारशाह येथे एक सर्वकक्ष नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आले असुन दिनांक 17/03/2021 पासुन हे नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आलेल्या आहे, 

या शाखे मध्ये तालुक्यातील सर्व विभागातील अधीकारी/कर्मचारी यांचा समावेश करण्यात आलेला आहे, या नियंत्रण कक्षामध्ये तालुक्यातील जनतेला विविध माहिती साठी, मदती साढी संपुर्ण माहिती एकाच ठिकानाहून मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली असल्याच तहसील‌दार संजय राईंचवार यांनी विदर्भ माझा न्युज 24 सोबत बोलतांना सागीतले आहे.


 नियंत्रण कक्षातील दूरध्वनी क्र. 07172-241398 



 तालुका  नियंत्रण कक्षा द्वारे करण्यात येणारी कामे  खालील प्रमाणे. 

1) तालुक्यातील पर्जन्यमानाची दैनंदीन माहीती संकलीत करण्यात येईल व जनतेला उपलब्ध करून दिले जाईल.

2) तालुक्यातील परिस्थीती बाबातची माहीती संकलीत करण्यात येईल व जिल्हा नियंत्रण कक्षास कळविण्यात येईल. (तालुक्यात घडणारे मानलनिर्मीत व नैसर्गीक आपत्तीची, रस्ते अपघात इ. माहीती)

3. कोविड - १९च्या अनुषंगाने

i) तालुक्यातील कोवीड केयर सेंटर, कोविड हेल्थ सेंटर व कोविड रुग्नालय व त्यामध्ये उपलब्ध खाटांची संख्या याबाबतची माहीती नियंत्रण कक्षात उपलब्ध राहील. जेने करून सामान्य नागरीकांना वेळीच माहीती देता येईल.

ii) गृह विलगीकरण व संस्थात्मक विलगीकरण या बाबत शासनाव्दारे वेळोवेळी निर्गमीत करण्यात आलेले आदेश व नियमावली यांची अद्यावत माहीती नियंत्रण कक्षात उपलब्द राहील जेनेकरून नियंत्रण कक्षात सामान्य नागरीकांनी विचारना केल्यास त्यांच्या  समस्यांचे निराकरन करता येईल. तसेच तालुक्यातील सर्व काॅन्टॅक्ट ट्रेसींग टीमची माहीती सुद्धा अद्यावत  ठेवण्यात येईल

iii) कोविड संदर्भात शासनाने, जिल्हा प्रशासनाव्दारे वा स्थानिक प्रशाषनाद्वारे निर्गमीत करण्यात आलेले सर्व आदेश  व‌ नियमावली यांची माहीती नियंत्रण कक्षात अद्यावत ठेवण्यात येईल जेने करून नागरीकांनी नियंत्रण कक्षात विचारना केल्यास त्यांना देता येईल.

iv) कोविड -19 चे लसीकरणा संबंधाने सर्व माहीती उदा. जसे  सेंटरची संख्या नावे,रजीस्टेशन इत्यादी.


4) आग लागल्यावर नियंत्रण कार्यवाही 

5) पुरपरीस्थीतीत करावयाची कार्यवाही

6) रस्ते अपघात (मोढ्या तिव्रतेचे) करावयाची कार्यवाही

7) तालुका नियंत्रण कक्षात ठेवावयाची माहीती

8) तालुक्यातील सर्व विभाग प्रमुखांची नावे व संपर्क क्रमांक व कार्यालयीन पत्ते.

9)तालीक्यातील अग्नीशमन विभाग असणार्या शासकीय/निमशासकीय/ खाजगी आस्थापनांची नावे,संपर्क क्रमांक व कार्यालयीन पत्ते.

10)तालुक्यातील शासकीय / खाजगी रुग्नालये / प्राथमीक आरोग्य केंद्र येथील संपर्क क्रमांक व कार्यालयीन पत्ते 

11)तालुक्यातील बोटचालक, क्रेनचालक, नदीत पट्टीचे पोहनारे यांची नावे अद्यावत माहीती नियंत्रण कक्षात ठेवावी.

12) मान्सुन काळात पाण्याखाली जानार्या पुलांची माहीती.

13) तालुक्यातील कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ सेंटर व कोविड रुग्नालयाची माहीती, नोडल अधीकारी यांची नावे, संपर्क क्रमांक यांची माहीती नियंत्रन कक्षात उपलब्द राहील.

14) तालुका स्थरावरील‌ शोध व बचाव‌ पथकातील सदस्य,स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवक यांची अद्यावत माहीती.

Previous Post Next Post