Top News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बल्हारशाह तर्फे श्री विजयादमी उत्सव शस्त्र पूजन संपन्न...... Balharshah of Rashtriya Swayamsevak Sangh completes Shree Vijayadami Utsav Shastra Poojan...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बल्हारशाह तर्फे श्री विजयादमी उत्सव शस्त्र पूजन संपन्न......



विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बल्हारशाह नगराचा विजयादशमी उत्सव स्थानिक दिलीप टॉकीज समोरील प्रांगणात उत्साहात संपन्न झाला, ह्यावेळी प्रमुख वक्ता म्हणून विदर्भ प्रांत घोष प्रमूख श्रीनिवास  बेडेकर व प्रमुख पाहुणे हेमंत गिडवाणी उपस्थित होते, तसेच मंचावर जिल्ला संघचालक, तालुका संघचालक, नगर कार्यवाह उपस्थित होते.

 कार्यक्रमापूर्वी मुख्य स्थानापासून नवीन बस स्थानक ते जुना बस स्थानक मार्गाने कार्यक्रम स्थळापर्यंत 80 स्वयंसेवकांचे घोष वादन तालावर पथसंचालन संपन्न झाले, ह्यावेळी ठीक ठिकाणी  स्वयंसेवकांचे पुष्प वर्षाव करीत नागरिकांनी स्वागत केले. कार्यक्रम स्थळी संघटन मंत्र उच्चाराने शस्त्र पूजन केले. तसेच दंड, नियुद्ध, योग,व्यायाम याचे  प्रात्यक्षिक उपस्थितांच्या समोर प्रदर्शन करण्यात आले,

 मुख्य वक्ते  बेडेकर ह्यांनी विजयादशमीचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेत असणारे महत्व विशद करताना 1925 साली विजयादशमीच्या दिवशी पूजनीय सरसंघचालक डॉक्टर हेडगेवारांनी संघस्थापणेच्या वेळी ज्या विचारांनी प्रेरित होऊन संघाची स्थापना केली त्या विचाराचे संगोपन करण्यासाठी अखंड प्रयत्नरत राहण्याची गरज प्रतिपादन केली, शाखेचे महत्त्व ह्यावेळी स्वयंसेवकांना सांगितले. दैनंदिन जीवनात जास्तीत जास्त वेळ संघ कामा करीत द्यावं असे आवाहन केले गेले. हा उत्सव बघण्याकरिता नगरातील सज्जन शक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होती.

Previous Post Next Post