मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठींबा दर्शविण्यासाठी गडचांदूरात उपोषण........
विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना : ग्रामीण प्रतिनिधी नितेश केराम +91 86984 23828
मराठा समाजाला आरक्षण मिळाव म्हुणुन जालना येते मनोज जरांगे पाटील यांचं 25 ऑक्टॉबर 2023 पासून आमरण उपोषण सुरु आहे सरकार कडून त्यांची मनधरणी करण्यात येत आहे परंतु त्यांनी अद्यापहीं त्यांचं हें उपोषण मागे घेतल नाही मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा दर्शवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक गडचांदूर येथे देखील सकल मराठा बांधव तालुका राजुरा कोरपना व जिवती यांच्या सहकार्याने अभिमन्यू चव्हाण पाटील यांनी आजपासून तीन दिवशीय लक्षणिय उपोषण सुरु केले आहे उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून जरांगे पाटील हें गेल्या काही दिवसापासून जालना येथे बेमुदत उपोषण करत आहेत मनोज जरांगे यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सरकार कडून सुरु आहे असं असतांना मनोज जरांगे हें मात्र मराठा आरक्षणावर ठाम आहेत.
त्यांच्या याच उपोषणाला पाठींबा दर्शविण्यासाठी अभिमन्यू चव्हाण पाटील हें उपोषणाला बसले आहेत कालपासुन गडचांदूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांनी हें उपोषण सुरु केले आहे.
