सँटू (SDS) क्लासेस व ग्रुप गर्भा स्पर्धेत विजयी.
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह
नवरात्री उत्सव दरम्यान रणरागिणी हिरकणी फौंडेशन व रोटरी क्लब तर्फे बल्हारशाह येथे 21ऑक्टोबर ते 23ऑक्टोबर भव्य गर्भा स्पर्धेचे आयोजन अतिशय सुंदर पद्धतीने करण्यात आले. याकरिता सँटू डान्स स्टुडिओ, एकदंत लॉन जवळ बल्हारशाह येथे गर्भा प्रशिक्षण 16 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर या दरम्यान घेण्यात आले होते. त्यात अनेक महिलांनी सहभाग घेतला. यामध्ये प्रशिक्षक संतोष पगारे व श्रेया व्यास यांनी आपले संपूर्ण योगदान दिले.
तसेच त्यांनी संपूर्ण चमू सहित गर्भा स्पर्धेत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. या स्पर्धेत ग्रुप मध्ये प्रथम बक्षीस - 1ट्रॉफी व 31,000 रोख रक्कम, सोलो मध्ये - श्रेया व्यास - ट्रॉफी व 7,000 रोख रक्कम, सोनम - बेस्ट एक्स्प्रेशन्स 1 ट्रॉफी, Duo : श्रेया व सोनम दुसरे बक्षीस - दोन ट्रॉफी व 11000 रोख बक्षीस असे पुरस्काराचे स्वरूप होते.
बक्षीस वितरण ना. सुधीर मुंगन्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले तसेच हरीष शर्मा, चंदन सिंह चंदेल व इतर मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत श्रेया व्यास, सोनम कौर कमलजीत बोण्ड , स्नेहीता ढोके, संगीता मेश्राम, स्नेहलता अमित पंडित, दर्शना पवार, निकिता हेडाऊ, रिया यादव अश्या 8 स्पर्धकाने उत्सुकतेने सहभाग घेतले व यश प्राप्त केले.
